मारुती स्विफ्ट ही भारतातील एक लोकप्रिय कार असून, तिची ऑन-रोड किंमत सुमारे ₹7.50 लाख आहे. जर तुम्ही ₹1 लाख डाउन पेमेंट भरले, तर 5 वर्षांसाठी सुमारे ₹13,500 ते ₹14,000 आणि 7 वर्षांसाठी ₹10,000 ते ₹11,000 पर्यंतचा EMI येऊ शकतो.
१ लाख रुपये भरून मारुती स्विफ्ट आणा घरी, किती भरावा लागणार EMI?
मारुती स्विफ्ट ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. दमदार मायलेज, स्टायलिश लूक आणि कमी मेंटेनन्समुळे ही गाडी मध्यमवर्गीयांची आवडती ठरत आहे.
25
गाडीची किती आहे किंमत?
मारुती स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹6.50 लाख ते ₹7 लाख दरम्यान आहे. ऑन-रोड किंमत (इन्शुरन्स, RTO, इतर खर्च धरून) साधारण ₹7.50 लाख किंमत जाते.
35
1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास कर्ज किती होईल?
जर तुम्ही ₹1,00,000 डाउन पेमेंट भरले, तर उरलेले ₹6.50 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज बहुतेक बँका 5 ते 7 वर्षांसाठी देतात.
जर कर्जाची मुदत 5 वर्षे (60 महिने) आणि व्याजदर 9% धरला, तर दरमहा EMI साधारण ₹13,500 ते ₹14,000 येतो. त्यामुळं आपण या हिशोबानुसार गाडीची खरेदी करायला हवी.
55
7 वर्षांसाठी EMI किती येईल?
जर कर्जाची मुदत 7 वर्षे (84 महिने) ठेवली, तर दरमहा EMI सुमारे ₹10,000 ते ₹11,000 इतका येऊ शकतो. मात्र, जास्त कालावधीमुळे एकूण व्याज जास्त भरावे लागते.