गरोदरपणातील मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहाराचे पालन करणे आवश्यक आहे. फायबर आणि आरोग्यदायी फॅट्स असलेले पदार्थ खाऊ शकता.
एकाच वेळी जास्त जेवण करणे टाळा. त्याऐवजी, थोड्या-थोड्या वेळाने कमी प्रमाणात खा. एकाच वेळी जास्त खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.
शरीराला आवश्यक व्यायाम मिळत असल्याची खात्री करा. चालणे, योगा यांसारखे हलके व्यायाम केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
वेळोवेळी ब्लड शुगर तपासायला विसरू नका. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
गरोदरपणात भरपूर पाणी पिण्याची काळजी घ्या. यामुळे किडनीमध्ये विषारी घटक जमा होण्यास प्रतिबंध होतो. दररोज किमान ८ ग्लास पाणी प्यावे.
Marathi Desk 1