होंडा ॲक्टिव्हा 125 ही एक प्रीमियम स्कूटर असून ती आधुनिक फीचर्स, आकर्षक डिझाइन आणि उत्तम इंजिन तंत्रज्ञानासह येते. ही स्कूटर चांगले मायलेज, आरामदायक राइड आणि कॉम्बाईन्ड ब्रेकिंग सिस्टमसारखे सेफ्टी फीचर्स देते.
Honda Activa 125: बाईक घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, किंमतीत झाली मोठी घट
नवीन बाईक घेणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. होंडाने त्यांची प्रसिद्ध होंडा ऍक्टिव्हाची कपात करण्यात आली आहे. या सिरीजमधील प्रीमियम मॉडेल होंडा ॲक्टिव्हा 125 (Honda Activa 125) सध्या आधुनिक फीचर्स, उत्तम इंजिन तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनमुळे ग्राहकांमध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे.
26
डिझाईन आणि लूक कसा?
होंडा ऍक्टिव्हाची डिझाईन आणि लुकबद्दलची आपण माहिती जाणून घेऊयात. समोरच्या बाजूला क्रोम ॲक्सेंट, शार्प हेडलँम्प डिझाइन आणि आकर्षक बॉडी लाइनमुळे स्कूटरला आधुनिक लूक मिळतो.
36
इंजिन आणि परफॉर्मन्स कसा आहे?
या स्कूटरमध्ये 123.92 सीसी सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन वापरले आहे. होंडाच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे इंजिन उत्तम कार्यक्षमता आणि कमी कंपन देते. शहरांतील गर्दीच्या रस्त्यांवर सहज चालवण्यासाठी तसेच हलक्या हायवे राईडसाठीसुद्धा हे उपयुक्त आहे.
हि गाडी खासकरून मायलेजसाठी ओळखली जाते. कमी खर्चात जास्त काळ चालवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मोठी सीट, आरामदायक राइडिंग पोझिशन आणि सीटखाली भरपूर जागा असल्यामुळे हे स्कूटर कुटुंबासाठी अधिक सोयीस्कर ठरते.
56
सेफ्टी फीचर्स काय आहेत?
सुरक्षेच्या दृष्टीनेही होंडाने पुरेपूर लक्ष दिले आहे. स्कूटरमध्ये कॉम्बाईन्ड ब्रेकिंग सिस्टम (CBS) आहे आणि ते अचानक ब्रेक लावताना स्थिरता राखण्यास मदत करते. रुंद टायर आणि मजबूत सस्पेंशनमुळे खराब रस्त्यांवरही चांगले नियंत्रण मिळते.
66
किंमत किती आहे?
होंडा ॲक्टिव्हा 125 साधारणपणे प्रीमियम स्कूटर सेगमेंटमध्ये येते. तिची किंमत इतर 125 सीसी स्कूटर्सच्या तुलनेत स्पर्धात्मक आहे. हि गाडी आपल्याला एक चांगला पर्याय म्हणून खरेदी करणार आहे.