Gold Rate Today : आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तब्बल 1209 रुपयांची उसळी, राज्यातील या शहरांमधील दर जाणून घ्या!

Published : Sep 22, 2025, 02:51 PM IST

Gold Rate Today : भारतीय बाजारपेठेत आज सोन्या-चांदीच्या किमतींनी चांगलाच झंझावात उठवला. सकाळी सौम्य वाढ दिसत असली तरी दुपारपर्यंत सोन्याचा भाव चांदीच्या धर्तीवर मोठ्या उंचीवर पोहोचला.

PREV
17
दुपारी १२ वाजता नवा टप्पा गाठला

२२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एमसीएक्सवर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,११,००० रुपयांच्या पुढे गेला. ही वाढ सोन्याच्या बाजारासाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली.

27
सोन्याचे दर

दुपारी १ वाजता १० ग्रॅम सोन्याचा दर १,११,०५६ रुपये नोंदवला गेला. यामध्ये तब्बल १,२०९ रुपयांची झेप घेतली गेली. दिवसभरात सोन्याचा नीचांक १,१०,२०२ रुपये तर उच्चांक १,०९,८४७ रुपये होता.

37
वाचा आजचे दर

IBJA नुसार आज २४ कॅरेट सोने – ₹१,०९,७७५ (१० ग्रॅम)

२२ कॅरेट सोने – ₹१,०९,३३५ (१० ग्रॅम)

१८ कॅरेट सोने – ₹१,००,५५४ (१० ग्रॅम)

47
चांदीतही वाढ

चांदीतही मोठी उसळी दिसून आली. दुपारी १ वाजता १ किलो चांदीचा दर ₹१,३२,४५७ नोंदवला गेला, म्हणजेच तब्बल ₹२,६१९ ने वाढ. दिवसभरातील नीचांक १,३०,६५८ रुपये आणि उच्चांक १,३२,६६५ रुपये इतका होता.

57
राज्यातील शहरांमधील दर

IBJA नुसार १ किलो चांदीची किंमत – ₹१,२८,०००

शहरानुसार दर (२२ सप्टेंबर, दुपारी १ वा.)

मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, नाशिक, कल्याण : सोने – ₹१,११,६३० / चांदी – ₹१,३२,१६०

67
देशातील इतर शहरांमधील दर

हैदराबाद : सोने – ₹१,११,८१० / चांदी – ₹१,३२,३७०

नवी दिल्ली : सोने – ₹१,११,४४० / चांदी – ₹१,३१,९३०

पणजी : सोने – ₹१,११,६६० / चांदी – ₹१,३२,१९०

77
आणखी चढ उतार होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल पाहता सोन्या-चांदीच्या भावात आणखी चढउतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read more Photos on

Recommended Stories