Suzuki GST Price Cut : नवरात्रीला पत्नीला-बहिणीला भेट द्या मोपेड, किमती ₹18,024 पर्यंत कमी!

Published : Sep 22, 2025, 09:47 AM IST

Suzuki GST Price Cut : नवीन GST नियमांमुळे, सुझुकीने आपल्या बाईक आणि स्कूटर मॉडेल्सच्या किमती ₹18,024 पर्यंत कमी केल्या आहेत. सणासुदीच्या काळात खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

PREV
15
सुझुकी बाईकच्या किमतीत घट

नवीन GST नियमांमुळे सुझुकीने बाईक आणि स्कूटरच्या किमती ₹18,024 पर्यंत कमी केल्या आहेत. या बदलांमुळे ग्राहकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर घरी मोपेड किंवा बाईक खरेदी करता येणार आहे.

25
सुझुकी कंपनीची मोठी घोषणा

350cc पेक्षा कमी क्षमतेच्या वाहनांवरील GST 28% वरून 18% झाला आहे. सणासुदीच्या काळात ही किंमत कपात खरेदीदारांसाठी एक उत्तम संधी आहे. जीएसटी कमी झाल्याने याचा लाभ कंपनीने ग्राहकांना दिला आहे. मोपेड आणि बाईकच्या किमती कमी केल्या आहेत.

35
दुचाकींवर आकर्षक सवलत

स्कूटर सेगमेंटमध्ये Access, Avenis, Burgman Street मॉडेल्सच्या किमती ₹7,823 ते ₹9,798 पर्यंत कमी झाल्या आहेत. छोट्या कुटुंबासाठी या मोपेड उत्तम आहेत. तसेच महिलांनाही या चालवायला सोप्या आहेत. 

45
व्ही-स्ट्रॉमच्या किमतीत मोठी घट

Gixxer 250 आणि SF 250 मॉडेल्स ₹16,000 पेक्षा जास्त स्वस्त झाले आहेत. V-Strom SX टूरिंग बाईकची किंमत ₹17,982 ने कमी झाली आहे. दिवाळी दसरा यापूर्वी या मोपेडची खरेदी केली जाऊ शकते. यासोबतच काही डिलर्सनीही काही डिस्काऊंट दिला आहे. 

55
स्कूटरच्या किमतीत मोठी घट

या किंमत कपातीमुळे ग्राहकांना फायदा होईल आणि सुझुकीच्या विक्रीतही वाढ होईल. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात बुकिंग अपेक्षित आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. घरी नवीन वाहन आणण्याची उत्तम संधी चालून आली आहे.

Read more Photos on

Recommended Stories