सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, किंमती 78 हजारांच्या पार

सोन्याच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ होत प्रति 10 ग्रॅमसाठी नागरिकांना आता 78,700 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी गेल्या शुक्रवारी सोन्याचे दर 78,450 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

Chanda Mandavkar | Published : Oct 7, 2024 11:32 AM IST / Updated: Oct 07 2024, 05:04 PM IST

Gold Price Today : ज्वेलर्सकडून सातत्याने केली जाणारी खरेदी आणि परदेशातील बाजारपेठेतील मजबूत ट्रेन्डमुळे सोन्याचे दर 250 रुपयांनी वाढून 78,700 रुपये प्रति 10 ग्रॅम सोमवारी (07 ऑक्टोबर) झाले आहेत. याआधी गेल्या शुक्रवारी सोन्याचे दर 78,450 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिले होते.

दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरात 200 रुपयांनी घट होत 94,000 रुपये प्रति किलो झाली आहे. याआधी शुक्रवारी चांदीचे दर 94,200 रुपये असल्याची माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली होती. दरम्यान, 99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ होत 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. याआधी सोन्याच्या किंमती 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

स्टॉकमध्ये वेळोवेळी होणारी गुंतवणूक आणि रिटेलर्स यांच्या मागणीमुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत चालली आहे. एशियन ट्रेडिंगच्या वेळेत कॉमेक्स गोल्ड USD 2,671.50 प्रति औंसपेक्षा 0.14 टक्क्यांपेक्षा अधिक राहिले. याशिवाय चांदीचे दर USD 32.20 प्रति औंसपेक्षा 0.16 टक्क्यांनी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कमी झाल्याचे दिसून आले.

आणखी वाचा : 

आज ९ बँकेचे शेअर्स खरेदी करण्याची संधी, मार्केटवर द्या लक्ष

WhatsApp वर येणार नवीन टायपिंग इंडिकेटर, जाणून घ्या काय असेल खास

Share this article