दसऱ्याचा उत्साह आता संपलाय आणि काहीच दिवसांत दिवाळीची लगबग सुरू होईल. अशातच आर्थिक तज्ज्ञांनी एक मस्त गुड न्यूज दिली आहे. यंदा दिवाळीत सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
सोन्याचे वाढलेले दर आता कमी होणार का? आर्थिक तज्ज्ञांनी यावर एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. यंदा दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळेल. सध्या सोन्याचे दर हळूहळू कमी होत आहेत. दिवाळीपर्यंत हे दर आणखी खाली येतील आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांनी या घसरणीचं प्रमाण आणि त्यामागची कारणंही स्पष्ट केली आहेत.
25
२१ ऑक्टोबरला सोन्याचे दर
आज (२१ ऑक्टोबर) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX) मार्केटमध्ये आज सोन्याचे दर ०.०३ टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव १,४६,४८२ रुपयांवर आला आहे. याआधी बाजारात सोन्याचा व्यवहार १,४६,५१९ रुपयांवर बंद झाला होता.
35
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात ०.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. प्रति औंस सोन्याचा भाव ४,१२८.९२ डॉलर इतका झाला आहे. सोन्याचे दर आता हळूहळू कमी होत असून याची कारणंही स्पष्ट आहेत.
दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर कमी होतील. या काळात भारतात सोन्याची मागणी वाढते, तरीही दर आवाक्यात राहतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण दिवाळी आणि धनत्रयोदशी संपताच लग्नसराई आणि इतर कारणांमुळे सोन्याची मागणी वाढेल आणि दर पुन्हा वधारतील.
55
सोन्याचे दर का घसरतायत?
हौथी बंडखोर सौदी अरेबियात तेल प्रकल्प आणि विमानतळांवर हल्ले करत आहेत. तसेच समुद्रधुनीमध्ये तेलाच्या जहाजांवरही हल्ले होत आहेत. यामुळे तेलाचे दर वाढतात आणि महागाईचा भडका उडतो. महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढवले जातात, तेव्हा गुंतवणूकदार चांगल्या रिटर्न्ससाठी इतरत्र गुंतवणूक करतात. यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होते, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .