
स्वतःची कार घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण नव्या कारची किंमत, इन्शुरन्स आणि ईएमआयचं टेन्शन खूप असतं. अशा वेळी सेकंड हँड कार्स हा एक बेस्ट ऑप्शन ठरतो. विशेषतः ३ लाखांच्या आत मिळणाऱ्या छोट्या कार्स तुम्ही सिटीत फिरण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी किंवा फॅमिलीसोबत जवळच्या ट्रिपसाठी वापरू शकता.
या बजेटमध्ये मारुती सुझुकी अल्टो 800, वॅगन आर, ह्युंदाई i10, रेनॉल्ट क्विड आणि ह्युंदाई इऑन सारखे मॉडेल्स मिळतात. कारचं मॅन्युफॅक्चरिंग इयर, किती किलोमीटर चालली आहे, कंडिशन आणि ओनरची संख्या यावर तिची किंमत ठरते. कार घेताना ती त्या किमतीला योग्य आहे की नाही, हे नक्की तपासून पाहा.
अंदाजित किंमत: १.५ लाख ते ३ लाख रुपये
बजेटमध्ये कार घेणाऱ्यांसाठी मारुती सुझुकी अल्टो 800 हा पहिला ऑप्शन असतो. या कारची साईझ छोटी असल्याने सिटी ट्रॅफिकमध्ये चालवायला आणि छोट्या जागेत पार्क करायला ती खूप सोपी जाते. अल्टो 800 चं पेट्रोल मॉडेल रोजच्या प्रवासासाठी एकदम परफेक्ट आहे. मारुती सुझुकीचे सर्व्हिस सेंटर्स सगळीकडे सहज मिळतात आणि स्पेयर पार्ट्सही स्वस्त असतात, हा याचा मोठा प्लस पॉईंट आहे.
पहिल्यांदाच कार घेणारे, छोटी फॅमिली आणि सिटीत जास्त फिरणाऱ्यांसाठी ही कार बेस्ट आहे. पण स्वस्तात मिळतेय म्हणून डोळे झाकून घेऊ नका. इंजिन, क्लच, एसी, टायर्स, इन्शुरन्स आणि सर्व्हिस हिस्ट्री नीट तपासा. जुनी कार असल्याने तिची कंडिशन खूप महत्त्वाची असते.
अंदाजित किंमत: २.३ लाख ते ३ लाख रुपये
कार छोटी असली तरी आतमध्ये भरपूर स्पेस हवी असेल, तर मारुती सुझुकी वॅगन आर हा एक उत्तम पर्याय आहे. या कारची डिझाईन थोडी उंच असल्याने कारमध्ये बसणं आणि उतरणं खूप सोपं जातं. ड्रायव्हर आणि पॅसेंजर्ससाठी कम्फर्टेबल सीटिंग आणि रोजच्या वापरासाठी पुरेशी केबिन स्पेस ही याची खासियत आहे.
फॅमिलीसोबत बाहेर जाण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी आणि सिटीत फिरण्यासाठी हे मॉडेल एकदम फिट बसतं. ३ लाखांच्या आत मिळणाऱ्या कारची कंडिशन आणि मॅन्युफॅक्चरिंग इयरनुसार किंमत बदलते. त्यामुळे या बजेटमध्ये जुनी कार पाहताना ती किती किलोमीटर चालली आहे, सर्व्हिस हिस्ट्री कशी आहे आणि काही अपघात झालाय का, हे नक्की तपासा.
अंदाजित किंमत: १.५ लाख ते ३ लाख रुपये
ह्युंदाई i10 ही सिटीतील प्रवासासाठी आणि छोट्या फॅमिलीच्या रोजच्या गरजांसाठी एकदम परफेक्ट हॅचबॅक कार आहे. या कारचा केबिन कम्फर्ट, सोपी ड्रायव्हिंग आणि प्रॅक्टिकल डिझाईन अनेकांना आवडते.
या बजेटमध्ये तुम्हाला i10 चे जुने मॉडेल्स मिळू शकतात. काही जुन्या मॉडेल्समध्ये ऑटोमॅटिक गिअरचा ऑप्शनही मिळू शकतो. पण फक्त ऑटोमॅटिक गिअर आहे म्हणून घाईघाईत कार घेऊ नका. मेकॅनिककडून गिअरबॉक्सची कंडिशन नक्की तपासून घ्या.
कार घेण्यापूर्वी एसी, सस्पेन्शन, क्लच किंवा गिअरबॉक्स आणि इंजिनची कंडिशन तपासा. जुन्या कारमध्ये निघणाऱ्या रिपेअरिंगच्या कामाला किती खर्च येईल, याचाही आधीच अंदाज घ्या.
अंदाजित किंमत: २.२ लाख ते ३ लाख रुपये
कार छोटी हवी आणि तिचा लूकही स्टायलिश असावा, असं वाटणाऱ्यांसाठी रेनॉल्ट क्विड हा बेस्ट ऑप्शन आहे. एसयूव्हीसारखा लूक, उंच डिझाईन आणि सिटीतील प्रवासासाठी योग्य साईझ हे याचे मुख्य हायलाईट्स आहेत. सेकंड हँड मार्केटमध्ये क्विडचे काही जुने मॉडेल्स ३ लाखांच्या आत सहज मिळतात.
पण फक्त किंमत पाहून निर्णय घेऊ नका. कारची सर्व्हिस हिस्ट्री, इंजिन कंडिशन, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स आणि स्पेयर पार्ट्स मिळण्याची शक्यता याबद्दल माहिती काढा. तुमच्या घराजवळ ऑथराईज्ड सर्व्हिस सेंटर आहे की नाही, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. ओनरकडून डॉक्युमेंट्स घ्या आणि मेकॅनिकला दाखवल्यानंतरच फायनल निर्णय घ्या.
अंदाजित किंमत: १.८ लाख ते ३ लाख रुपये
३ लाखांच्या आत मिळणारी आणखी एक छोटी कार म्हणजे ह्युंदाई इऑन. सिटीत फिरण्यासाठी आणि छोट्या जागेत पार्क करण्यासाठी ही कार एकदम फिट बसते. बजेटमध्ये पहिली कार घेणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. इऑनचे मॉडेल्स बऱ्याच वर्षांपूर्वी मार्केटमध्ये आले होते, त्यामुळे आता मिळणाऱ्या कार्स थोड्या जुन्या असू शकतात. म्हणूनच किमतीपेक्षा कारच्या सध्याच्या कंडिशनला जास्त महत्त्व द्या.
इंजिन, क्लच, एसी, सस्पेन्शन आणि टायर्स चेक करण्यासोबतच.. कारचा काही अपघात झालाय का किंवा ती पुरात बुडाली होती का, याचीही चौकशी करा. तसेच कारची आरसी, इन्शुरन्स आणि ओनरशिप डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही, हे तपासा. स्वस्तात घेतलेली कार नंतर रिपेअरिंगच्या नावाने खिशाला कात्री लावणार नाही, याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
३ लाखांत कार मिळतेय म्हणून घाईघाईत खरेदी करू नका. जुनी कार निवडताना तिची कंडिशन, डॉक्युमेंट्स आणि भविष्यातील मेंटेनन्सचा खर्च नक्की तपासा.
४. टेस्ट ड्राईव्ह: कार चालवून पाहा आणि इंजिन, ब्रेक्स, क्लच, गिअरबॉक्स, एसी आणि टायर्सची कंडिशन समजून घ्या. शक्य असल्यास ओळखीच्या मेकॅनिकला सोबत घेऊन जा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ॲडव्हान्स देऊ नका. तुमचं संपूर्ण बजेट फक्त कार घेण्यावरच खर्च करू नका, अचानक निघणाऱ्या रिपेअरिंगसाठी थोडे पैसे बाजूला ठेवा. ३ लाखांच्या आत एक चांगली सेकंड हँड कार नक्की मिळू शकते. पण कोणतं मॉडेल घेतोय यापेक्षा.. ती कार कोणत्या कंडिशनमध्ये आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे.