Ghibli Trend च्या नादात खासगी फोटो शेअर करताय? वाचा धक्कादायक सत्य

Published : Apr 02, 2025, 09:29 AM IST

सध्या सोशल मीडियावर Ghibli Style फोटोचा ट्रेन्ड सुरू आहे. पण ज्या व्यक्तींनी आपले खासगी फोटो घिबिली आर्टच्या नादात शेअर केले आहेत ते कुठे जातायत हे माहितेय का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ. 

PREV
16
घिबिली आर्टचा ट्रेन्ड

घिबिली आर्टचा ट्रेन्ड सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये तुमचे फोटो AI च्या माध्यमातून तयार केले जात असून तुम्हाला अ‍ॅनिमेटेड फोटो तयार करुन दिले जातात. पण तुम्ही विचार केलाय का, घिबिल स्टाइल आर्टच्या नादात तेथे शेअर करण्यात आलेले खासगी फोटो नक्की कुठे जात आहेत? याशिवाय हे खासगी फोटो आर्टिफिशियल प्लॅटफॉर्मवर सेव्ह होतायत का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.

26
ट्रेन्डच्या नादात शेअर केलेत का फोटो?

ChatGPT आणि Grok सारख्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या घिबिल आर्टच्या माध्यमातून युझर्स आपले खासगी फोटो शेअर करत आहेत. यावेळी ट्रेन्डच्या नादात फोटो शेअर केले असले तरीही प्रायव्हेसीचा प्रश्न उद्भवला जातोय. खरंतर, घिबिल आर्टच्या नादात AI टूल्समध्ये शेअर करण्यात आलेले फोटो ते आर्टिफिशियल प्लॅटफॉर्मवरच स्टोर करण्यासह याचा वापर ट्रेनिंगसाठी देखील केला जात आहे. याशिवाय ट्रेन्डच्या नादात फेशियल डेटा ऑनलाइन स्टोर केला जात असल्याचेही बोलले जात आहे.

36
चॅटजीपीटीवर सुरक्षित आहे का डेटा?

सायबर एक्सपर्ट्स घिबिल आर्टच्या ट्रेन्डवर चिंता व्यक्त करत आहेत. खरंतर, चॅटजीपीटीला विचारले असता हा ट्रेन्ड सुरक्षित आहे का यावर उत्तर असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. हा पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे मानले जाऊ शकत नाही.

46
फोटो ऑनलाइन स्टोर होतायत का?

ट्रेन्डवेळी शेअर करण्यात आलेले फोटो एआय इमेज जनरेशन टूल्स, सोशल मीडिया साइट्स आपल्या सर्व्हरवर स्टोर करू शकतात. काही प्लॅटफॉर्म अस्थायी रुपात इमेज स्टोर करतात. पण काही दीर्घकाळासाठी स्टोर करतात.

56
फोटो सार्वजनिक होऊ शकतात का?

काही प्लॅटफॉर्मवर तुमचे फोटो अन्य गोष्टींसाठी उपलब्ध होऊ शकतात. खासकरुन प्लॅटफॉर्मचा कोणताही सार्वजनिक फीचर नसेल. प्रायव्हेसी पॉलिसी (Privacy Policy) वाचून घ्यावी असा सल्ला आता दिला जात आहे.

66
फोटो असे करा सुरक्षित (How to secure photos)
  • ट्रेन्डवेळी फोटो अपलोड करताना प्रायव्हेसी सेटिंग तपासून पहा.
  • संवेदनशील फोटो अपलोड करणे टाळा.
  • प्लॅटफॉर्मचा अटी आणि नियम वाचा.
  • AI टूल्सला आपले फोटो सेव्ह करू देऊ नका.

Recommended Stories