What Is A Vertical Property Card: सावधान! फ्लॅट तर तुमचा, पण खालची जमीन कुणाची? ९९% फ्लॅटधारकांना 'हे' धक्कादायक सत्य माहितच नाही!

Published : Mar 15, 2026, 06:09 PM IST

What Is A Vertical Property Card: अनेकदा फ्लॅटधारकांची मालकी फक्त घरापुरती मर्यादित असते, पण इमारतीखालची जमीन बिल्डरच्या नावावर असते, ज्यामुळे पुनर्विकासात अडथळे येतात. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' आणले आहे.

PREV
15
सावधान! फ्लॅट तर तुमचा, पण खालची जमीन कुणाची?

मुंबई: आयुष्यभराची पुंजी लावून आपण स्वप्नातलं घर खरेदी करतो, वेळेवर EMI भरतो आणि दरमहा मेंटेनन्सही देतो. पण कधी विचार केलाय का, की ज्या इमारतीत तुमचा फ्लॅट आहे, त्याखालच्या जमिनीचे मालक नेमके कोण आहेत? अनेकदा फ्लॅट आपला असतो, पण जमीन मात्र बिल्डरच्या किंवा जुन्या मालकाच्या नावावर असते. पुनर्विकासाच्या (Redevelopment) वेळी हाच मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. 

25
जमिनीच्या मालकीचा नेमका 'लोचा' काय?

बहुतांश गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये इमारतीखालील जमिनीचा ताबा (Conveyance) सोसायटीकडे नसतो. जेव्हा इमारत जुनी होते आणि पुनर्विकासाची वेळ येते, तेव्हा जमिनीच्या मालकीचा प्रश्न उभा राहतो. जमीन नावावर नसल्यास बिल्डरच्या मनमानीला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' (Vertical Property Card) ही संकल्पना आणली आहे. 

35
काय आहे 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड'?

हे कार्ड म्हणजे तुमच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्याचा आधुनिक विस्तार आहे. यात इमारतीशी संबंधित सर्व कायदेशीर माहिती एकाच ठिकाणी मिळते.

वैयक्तिक वाटा: इमारतीच्या एकूण क्षेत्रफळात तुमच्या फ्लॅटचा नेमका किती वाटा आहे, याची स्पष्ट नोंद असते.

कार्पेट एरिया: प्रत्येक फ्लॅटचे अधिकृत क्षेत्रफळ नमूद केलेले असते.

कर्जाची माहिती: संबंधित मालमत्तेवर काही कर्ज (Loan) काढले असल्यास, त्याचा तपशीलही यात असतो.

सामायिक क्षेत्र: गच्ची, पार्किंग आणि गार्डन यांसारख्या कॉमन एरियामधील प्रत्येक मालकाचा हिस्सा स्पष्ट होतो. 

45
हे कार्ड नसेल तर काय होईल?

१. पुनर्विकासात अडथळे: जमीन नावावर नसेल तर पुनर्विकासासाठी बिल्डरवर अवलंबून राहावे लागेल, ज्यामुळे प्रकल्पाला विलंब होऊ शकतो.

२. बिल्डरची मनमानी: जमिनीची मालकी बिल्डरकडे असल्यास तो एफएसआय (FSI) किंवा इतर लाभांसाठी अडवणूक करू शकतो.

३. कायदेशीर गुंतागुंत: भविष्यात सोसायटीच्या मालमत्तेचे हस्तांतरण करताना किंवा विक्री करताना अडचणी येऊ शकतात. 

55
'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' हे फ्लॅटधारकाचे सुरक्षा कवच

'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' हे फ्लॅटधारकाचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. हे कार्ड असल्यास तुम्हाला जमिनीच्या हक्कासाठी कोणासमोरही हात पसरण्याची गरज पडणार नाही.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories