Choking Child : मुलांच्या घशात अन्न अडकल्यास काय करावं?, अत्यंत महत्त्वाची बातमी

Published : Dec 29, 2025, 11:05 AM IST
CHOKING KIDS

सार

घराच्या अंगणात खेळताना मुलाने दगड आणि माती तोंडात टाकली होती. त्यामुळे पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुलांच्या घशात अन्न किंवा इतर वस्तू अडकल्यास काय करावे, याबद्दल बहुतेक पालकांना माहिती नसते.

लहान मुलांकडे दुर्लक्ष झाले तर ते महागात पडू शकते. याबाबतच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. यातच मलप्पुरममध्ये घशात दगड अडकून एका वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. पल्लिकरा थेक्कुमुरी येथील महरूफ यांचा मुलगा अस्लम नूह याचा मृत्यू झाला. घराच्या अंगणात खेळताना मुलाने दगड आणि माती तोंडात टाकली होती. त्यामुळे पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

मुलांच्या घशात अन्न किंवा इतर वस्तू अडकल्यास काय करावे, याबद्दल बहुतेक पालकांना माहिती नसते. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इतर काहीही तोंडात घातल्यास मुलांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता जास्त असते. लहान मुलांच्या घशात अन्न अडकण्याची शक्यता खूप जास्त असते. अन्न नीट चावून न खाल्ल्यामुळे असे अपघात जास्त घडतात. त्यामुळे पालकांनी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात. अबू धाबी शेख खलिफा मेडिकल सिटीमधील आपत्कालीन विभागाचे वरिष्ठ विशेषज्ञ डॉ. दानिश सलीम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. 

मुलांच्या घशात अन्न किंवा वस्तू अडकल्यास काय करावे?

पाच वर्षांखालील मुलांना लहान खेळणी देऊ नका. मुले खेळत असताना नेहमी त्यांच्यासोबत राहा. मुलांना खाऊ घालताना, जर तुम्ही गाजर किंवा काकडीसारख्या भाज्या देत असाल, तर त्यांचे लहान तुकडे करून देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांना खाणे सोपे होईल आणि ते सहज पचेल.

लहान मुलांना पॉपकॉर्न देऊ नका. कारण ते घशात अडकण्याची शक्यता जास्त असते. बटण, बॅटरीसारख्या वस्तू घरात अस्ताव्यस्त ठेवू नका. कारण, अशा वस्तू घशात गेल्यास मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्यांची तडफड होऊ शकते.

अशावेळी मुलाला लगेच खोकण्यास सांगा. खोकल्यामुळे घशात अडकलेली वस्तू बाहेर येण्यास मदत होते. जर मुलाला खोकता येत नसेल आणि तो उभा राहू शकत असेल, तर त्याच्या पाठीमागे उभे राहा. एक मूठ वळून मुलाच्या बेंबीच्या भागावर ठेवा. दुसऱ्या हाताने ती मूठ पकडा आणि इंग्रजीतील 'J' अक्षर उलटे जसे लिहितात, तसे आतल्या बाजूला दाबून वरच्या दिशेने झटका द्या. 

असे सतत केल्याने घशात अडकलेली वस्तू बाहेर फेकण्यास मदत होते. याला 'heimlich maneuver' म्हणतात.  हे अचूकपणे करा. जर मूल बेशुद्ध पडले, तर CPR द्यावा. मुलांच्या घशात वस्तू अडकल्यास घाबरून न जाता हे करणे आवश्यक आहे, असे अबू धाबी शेख खलिफा मेडिकल सिटीमधील आपत्कालीन विभागाचे वरिष्ठ विशेषज्ञ डॉ. दानिश सलीम सांगतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

वजन कमी करण्यासाठी 'हे' आहेत 6 फायबरयुक्त फायदेशीर पदार्थ
Drink Water During Winter : हिवाळ्यात पाणी प्यायलाच हवं... ही आहेत 6 महत्त्वाची कारणं!