Finance Tips : जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल, तर पर्सनल लोन मिळण्याची शक्यता कमी होते. जरी कर्ज मिळाले तरी ते जास्त व्याजावर दिले जाते. यामागे काही छुपे खर्च (Hidden Costs) कारणीभूत असतात. ५ पॉइंट्समध्ये जाणून घ्या याचा परिणाम…
खराब क्रेडिट स्कोअर असल्यास बँका जास्त व्याजदराने कर्ज देतात. उदा. ५ लाखांच्या कर्जावर १% जास्त व्याज म्हणजे ₹८,४८७ अतिरिक्त खर्च. त्यामुळे चांगला स्कोअर ठेवा, कर्ज सहज आणि कमी व्याजात मिळेल.
25
जास्त क्रेडिट कार्ड चार्ज आणि अतिरिक्त खर्च
खराब क्रेडिट स्कोअरमुळे क्रेडिट कार्डवरही अनेकदा जास्त व्याज आणि शुल्क आकारले जाते. पेमेंटला थोडा उशीर झाल्यास किंवा छोटीशी चूक झाल्यास बँक किंवा NBFC तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकते.
35
आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम
कमी क्रेडिट स्कोअरचा तुमच्या दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर परिणाम होतो. यामुळे कर्ज मंजुरी, व्याजदर आणि गुंतवणुकीवर परिणाम होतो. वेळेवर EMI न भरल्यास तुमची आर्थिक विश्वासार्हता कमी होते.
खराब स्कोअरमुळे घर, कार किंवा शिक्षणासाठी कर्ज घेणे कठीण होते. बँका जास्त व्याज आकारतात किंवा कर्ज नाकारतात. यामुळे तुमच्या मोठ्या खर्चांच्या आणि महत्त्वाच्या योजनांमध्ये अडथळे येतात.
55
भविष्यातील योजनांना ब्रेक लागू शकतो
कमी क्रेडिट स्कोअरमुळे तुमच्या भविष्यातील योजनांवर परिणाम होतो. नवीन व्यवसाय, कर्ज किंवा गुंतवणुकीसाठी बँका विश्वास ठेवत नाहीत. यामुळे तुमची आर्थिक लवचिकता (Financial Flexibility) कमी होते.
(डिस्क्लेमर: हा लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिला आहे. यात दिलेली माहिती आर्थिक सल्ला किंवा कर्ज-क्रेडिट निर्णयांना पर्याय नाही. कोणतेही कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा किंवा बँक-NBFC चा सल्ला नक्की घ्या.)