Nitin Gadkari : पुढील 4 ते 6 महिन्यांत देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने कमी होतील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
पुढील 4-6 महिन्यांत EV आणि पेट्रोल गाड्यांची किंमत समान होईल. GST दर कमी केल्याने आणि सेस काढून टाकल्याने वाहनांच्या किमती आधीच कमी झाल्या आहेत. लहान गाड्यांवरील कर 18% पर्यंत कमी झाला आहे.
23
भारताचे तिसरे सर्वात मोठे ऑटोमोबाईल क्षेत्र
गडकरी म्हणाले, भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचे मूल्य 14 लाख कोटींवरून 22 लाख कोटींवर पोहोचले आहे. अमेरिका (78 लाख कोटी) आणि चीन (47 लाख कोटी) नंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
33
इथेनॉल, कचऱ्याचा वापर करून रस्ते बांधकाम
मक्यापासून इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांनी 45,000 कोटी रुपये अतिरिक्त कमावले आहेत. 2027 पर्यंत, रस्ते बांधकामासाठी घनकचरा वापरून कचऱ्याचा सुयोग्य वापर केला जाणार आहे.