आधार–पॅन लिंक करणे
शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे. बँक व्यवहार, पीक विमा, अनुदान, कर्ज तसेच विविध सरकारी योजनांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. जर एखाद्या शेतकऱ्याने 1 ऑक्टोबर 2024 किंवा त्यापूर्वी आधार कार्ड काढले असेल आणि पॅनशी लिंक केले नसेल, तर 31 डिसेंबरनंतर पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.
पॅन निष्क्रिय झाल्यास
बँक व्यवहार अडचणीत येऊ शकतात
शेतमाल विक्रीची रक्कम अडकू शकते
अनुदान व सरकारी मदत मिळणे थांबू शकते
ही प्रक्रिया आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाईन करता येते. उशीर झाल्यास दंड आकारला जाऊ शकतो, त्यामुळे ही लिंकिंग तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.