Fake 500 Rupee Notes On The Rise RBI Issues Alert : २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला आहे. ५०० रुपयांच्या बनावट नोटांसोबतच १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटाही आढळून आल्या आहेत.
भारतातील सर्वात मोठी नोट ५०० रुपयांची आहे. २००० च्या नोटा बंद झाल्यामुळे बाजारात बनावट नोटा वाढल्या आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. देशात सध्या १,७७,७२२ बनावट ५०० रुपयांच्या नोटा चलनात आहेत.
24
बनावट नोटांची संख्या
दरवर्षी बनावट नोटांची संख्या वाढत असल्याचे सरकारला आढळून आले आहे. २००० च्या नोटा बंद झाल्यापासून ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा वापर वाढला आहे. बनावट नोटांच्या टोळ्या आता ५०० रुपयांच्या नोटांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
34
बनावट चलन
फक्त ५०० रुपयांच्याच नाही, तर १०० आणि २०० रुपयांच्या नोटाही बनावट बनवल्या जात आहेत. आकडेवारीनुसार, ५१,०६९ बनावट १०० रुपयांच्या आणि ३२,६६० बनावट २०० रुपयांच्या नोटा चलनात आहेत.
बनावट नोटांचा प्रसार रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक सतत प्रयत्न करत आहे. नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह नोटा आणल्या जात असल्या तरी, बनावट नोटा बाजारात येत आहेत. तरीही अशा नोटा तुमच्या निदर्शनास आल्यास लगेच बॅंकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.