EV मध्ये Bajaj चा डंका, TVS ला टाकले मागे, Chetak वर स्वार होऊन झाली नंबर 1 कंपनी!

Published : Nov 03, 2025, 09:58 AM IST

Bajaj Chetak Overtakes TVS : भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात बजाजने TVS ला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या विक्रीत बजाजने 29,567 युनिट्सची विक्री केली आहे. 

PREV
14
बजाज इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री ( Bajaj Chetak Overtakes TVS )

भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी (EV) बाजारात मोठा बदल झाला आहे. TVS मोटरला मागे टाकत बजाज पुढे गेली आहे. ओला इलेक्ट्रिक देखील एथर एनर्जीच्या मागे पडली आहे. बजाजने ऑक्टोबरमध्ये अव्वल स्थान पटकावले.

24
बजाजने TVS ला टाकले मागे

'वाहन' पोर्टलनुसार, बजाजने ऑक्टोबरमध्ये 29,567 स्कूटर विकून 21.9% बाजार हिस्सा मिळवला. TVS ने 28,008 युनिट्स विकले (20.7% हिस्सा). मोठे डीलर नेटवर्क हे त्यांच्या यशाचे कारण आहे.

34
एथर एनर्जीची विक्री

एथर एनर्जीने ऑक्टोबरमध्ये 26,713 युनिट्स विकले आणि 19.6% बाजारपेठेसह तिसरे स्थान मिळवले. सणासुदीच्या काळात विक्री वाढली. एथरने सलग दुसऱ्या महिन्यात तिसरे स्थान पटकावले आहे.

44
इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री

दुसरीकडे, ओला इलेक्ट्रिकने 15,481 युनिट्स विकले (11.6% हिस्सा) आणि चौथ्या स्थानावर आहे. यामुळे एथर आणि ओलामधील फरक वाढला आहे. विडा, अँपिअरसारख्या नवीन कंपन्याही स्पर्धेत आहेत.

Read more Photos on

Recommended Stories