Exchange Offer: मोफत आयफोन हवा आहे? तुमच्या घरातील जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बदल्यात नवीन ॲपल आयफोन, एअरपॉड्स किंवा मॅकबुक मिळवण्याची एक उत्तम संधी ॲप्ट्रॉनिक्स स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. काय आहे ही एक्स्चेंज ऑफर? सविस्तर जाणून घेऊया.
ॲपल प्रेमींसाठी मोठी संधी! एकही रुपया न देता ॲपल घरी घेऊन जा!
ॲपलची उत्पादने खूप महाग असतात. त्यामुळे नवीन ॲपल उत्पादन खरेदी करताना अनेकजण रिटेलर्सच्या ऑफर्सवर अवलंबून असतात. जसे की क्रेडिट कार्ड कॅशबॅक, सणासुदीच्या दिवसांतील सूट किंवा जुन्या फोनची एक्सचेंज ऑफर. सहसा, आपण वापरत असलेला जुना स्मार्टफोन दिल्यास काही रक्कम कमी करून नवीन फोन दिला जातो.
पण, आता इतिहासात पहिल्यांदाच ॲपल उत्पादनांवर एक सुपर ऑफर आली आहे. या ऑफरद्वारे फक्त जुना फोनच नाही, तर तब्बल १० प्रकारची जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे एकाच वेळी एक्सचेंज करण्याची सोय आहे. यामुळे तुम्ही एकही रुपया न भरता आयफोन मिळवू शकता.
26
कोणत्या वस्तू एक्सचेंज करता येतील?
या ऑफरचे वैशिष्ट्य म्हणजे, एक्सचेंज करायच्या वस्तू ॲपल ब्रँडच्या असण्याची गरज नाही. त्या कोणत्याही कंपनीच्या असल्या तरी चालतील. तसेच, त्या कोणत्याही स्थितीत असल्या तरी स्वीकारल्या जातील.
तुमच्या घरातील जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की टोस्टर, मायक्रोवेव्ह ओव्हन, जुने फोन, एअर प्युरिफायर, ब्लूटूथ स्पीकर, लॅपटॉप यांसारख्या कोणत्याही वस्तू एक्सचेंज करता येतील. वस्तू कितीही जुनी किंवा बंद असली तरीही ही ऑफर लागू आहे. एकाच वेळी जास्तीत जास्त 10 वस्तू एक्सचेंज करण्याची संधी आहे.
36
ॲपलचे उत्पादन मोफत कसे मिळेल?
या एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्हाला मोफत ॲपल एअरपॉड्स, ॲपल वॉच किंवा मोठ्या सवलतीत आयफोन, मॅकबुक मिळवण्याची संधी आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एक्सचेंज करत असलेल्या 10 जुन्या वस्तूंचे सरासरी मूल्य प्रत्येकी 3 हजार रुपये आहे असे समजूया.
तर, 10 वस्तूंसाठी तुम्हाला एकूण 30 हजार रुपयांची सूट मिळेल. या रकमेत तुम्ही मोफत ॲपल एअरपॉड्सची एक जोडी खरेदी करू शकता. किंवा नवीन आयफोन, मॅकबुकच्या किमतीतून ही 30 हजार रुपयांची रक्कम कमी करू शकता.
ही जबरदस्त ऑफर सध्या भारतभरातील 70 ॲप्ट्रॉनिक्स (Aptronix) स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. हा एक्सचेंज प्रोग्राम ॲप्ट्रॉनिक्ससाठी सर्व्हिफाय (Servify) नावाची कंपनी चालवत आहे.
ग्राहक त्यांच्या जुन्या वस्तू घेऊन थेट जवळच्या ॲप्ट्रॉनिक्स स्टोअरमध्ये जाऊ शकतात. तेथे सर्व्हिफायचे प्रतिनिधी तुमच्या वस्तूंची तपासणी करून त्यांचे मूल्य ठरवतील.
56
वस्तूचे मूल्य कसे ठरवले जाते?
तुम्ही देत असलेल्या जुन्या वस्तूंना किती किंमत मिळेल, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. यासाठी सर्व्हिफाय कंपनीने काही मानक दर ठरवले आहेत. इतकेच नाही, तर तुमच्या शहरातील इतर स्थानिक ट्रेड-इन पार्टनर्स देत असलेल्या किमतीएवढीच किंमत देण्याची हमी ते देत आहेत.
याचा अर्थ, तुमच्या जुन्या वस्तूंसाठी बाजारात मिळणारे सर्वोत्तम एक्सचेंज मूल्य तुम्हाला ॲप्ट्रॉनिक्स स्टोअर्समध्ये मिळू शकते.
66
या ऑफरमागे नेमका उद्देश काय आहे?
एका जुन्या वस्तूऐवजी दहा वस्तू एक्सचेंज करण्यास ही कंपनी का तयार झाली आहे? यामागे एक मोठे पर्यावरणस्नेही कारण आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste) गोळा करून, त्याचे नैतिकतेने रिसायकलिंग करणे किंवा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
डिजिटल कचऱ्यामुळे पर्यावरणाला होणारे नुकसान कमी करण्यासाठी या कंपन्या प्रयत्न करत आहेत. शिवाय, गोळा केलेल्या कचऱ्याच्या बदल्यात, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्याचा कार्यक्रमही त्या राबवत आहेत. त्यामुळे, ही केवळ सवलतीची ऑफर नाही, तर पर्यावरण संरक्षणाचा एक भाग देखील आहे.