Economic Crisis : आर्थिक संकटातही राहायचंय सेफ? हे ४ गोल्डन रूल्स तुमच्यासाठीच आहेत!

Published : Oct 06, 2026, 09:11 AM IST

Economic Crisis: तज्ज्ञ सध्या आर्थिक मंदीचा इशारा देत आहेत. या संकटात स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं आणि कोणती काळजी घ्यायची, हे आपण जाणून घेऊया.

PREV
13
आर्थिक संकट

जगभरात सध्या आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे. अशा बातम्या ऐकून भीती वाटणं साहजिक आहे. पण घाबरून जाण्यापेक्षा या संकटातून बाहेर पडण्याचा विचार आपण करायला हवा. यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणं खूप गरजेचं आहे. भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, ते आता पाहूया.

23
आपत्कालीन फंड

१. इमर्जन्सी फंड (Emergency Fund): आर्थिक संकटात इमर्जन्सी फंड आपला सर्वात मोठा आधार असतो. नोकरी गेली किंवा अचानक मोठा खर्च आला, तर किमान ६ ते १२ महिन्यांचा घरखर्च भागेल एवढे पैसे बाजूला काढून ठेवा. हे पैसे सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड म्युच्युअल फंडात ठेवा, जेणेकरून ते लगेच काढता येतील.

२. कर्ज कमी करा: तुमच्यावर क्रेडिट कार्डचं बिल, पर्सनल लोन किंवा जास्त व्याजाचं कर्ज असेल, तर ते लवकरात लवकर फेडा. मंदीच्या काळात जास्त व्याज भरणं महागात पडू शकतं. तसेच, नवीन कोणतंही मोठं कर्ज घेणं टाळा.

33
अनावश्यक खर्च

३. अनावश्यक खर्च टाळा: अशा काळात खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त 'गरजेच्या' वस्तूंवरच पैसे खर्च करा. अनावश्यक शॉपिंग, बाहेर जेवणं आणि महागडे सबस्क्रिप्शन बंद करून घराचं बजेट सांभाळा.

४. गुंतवणुकीत विविधता: तुमचे सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका. फिक्स डिपॉझिट (FD), सोनं आणि सरकारी बाँड्ससारख्या सुरक्षित पर्यायांचा विचार करा. शेअर बाजारात पैसे लावताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

५. उत्पन्नाचे नवीन मार्ग: फक्त एकाच नोकरीवर अवलंबून राहू नका. फ्रीलान्सिंग, पार्ट-टाइम काम किंवा तुमच्या कौशल्याचा वापर करून जास्तीचे पैसे कसे कमवता येतील, याचा विचार करा.

फक्त पैसे वाचवणं पुरेसं नाही, तर ते हुशारीने खर्च करणंही महत्त्वाचं आहे. या सवयी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक संकटात सुरक्षित ठेवतील.

Read more Photos on

Recommended Stories