Chanakya Niti: आजकाल लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. काहीवेळा तर प्रकरण जीवावर बेततं. अशा धोकादायक परिस्थितीत अडकू नये, यासाठी आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुम्हाला योग्य जोडीदार निवडायला मदत करतील.
आयुष्याचा जोडीदार निवडताना एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणूनच, आचार्य चाणक्यांनी सांगितलेले नियम पाळल्यास तुमचं वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकतं. लग्नाआधी आपण कोणत्या व्यक्तीची निवड करत आहोत, यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. चाणक्य नीती काय सांगते ते जाणून घेऊया.
24
बाह्य सौंदर्य पाहून किंवा दिसण्यावर भाळून कधीही जोडीदार निवडू नका
चाणक्यांच्या मते, व्यक्तीची खरी ओळख त्याच्या स्वभावावरून होते. केवळ बाह्य सौंदर्य पाहून किंवा दिसण्यावर भाळून कधीही जोडीदार निवडू नका. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे पूर्णपणे जाणून घ्या. खोटं बोलणाऱ्या, रागीट आणि स्वार्थी लोकांना निवडल्यास तुम्हाला भविष्यात नक्कीच त्रास होईल. अशा लोकांना आयुष्यात न आणलेलंच बरं.
34
घरातील वातावरण आणि कुटुंबीयांची मानसिकता समजून घ्या
फक्त व्यक्ती आवडली म्हणजे झालं असं नाही, तर तिचं कुटुंब कसं आहे हे जाणून घेणंही खूप महत्त्वाचं आहे. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर तिच्या कौटुंबिक संस्कारांचा प्रभाव असतो. म्हणूनच, लग्नाआधी तुमच्या भावी जोडीदाराच्या घरातील वातावरण आणि त्यांच्या कुटुंबीयांची मानसिकता समजून घ्या. चांगल्या संस्कारांच्या कुटुंबातून आलेली व्यक्ती तुमचं आयुष्य आनंदी करू शकते, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
चारित्र्य संशयास्पद असेल किंवा विश्वासार्ह नसेल, तर ...
चाणक्य नीतीनुसार, चारित्र्य ही व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य संशयास्पद असेल किंवा ती विश्वासार्ह नसेल, तर तिच्यामुळे भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, तुमचा होणारा जोडीदार तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल किंवा तुमचा आदर करत नसेल, तर सावध राहा. परस्पर आदर आणि विश्वासाशिवाय कोणतंही नातं जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे लग्नाआधी या गोष्टीचा नक्की विचार करा.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .