मुंबईकरांनो, सुट्टी एन्जॉय करा! मध्य रेल्वेकडून 76 हॉलिडे स्पेशल ट्रेन्स! तिकीट बुकिंग कधी सुरू?

Published : Dec 09, 2025, 10:19 PM IST

Central Railway Special Trains 2025 : नाताळ, नववर्षाच्या सुट्टीत वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 76 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली. या गाड्या मुंबई, नागपूर, करमळी, पुणे यांसारख्या मार्गांवर धावणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार.

PREV
17
नाताळात गर्दीचे टेन्शन? रेल्वेची ही घोषणा नक्की वाचा

मुंबई : नाताळ, थर्टीफर्स्ट आणि हिवाळी सुट्ट्या म्हणजे प्रवासाचा हंगाम! या काळात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवासी मागणीत होणाऱ्या प्रचंड वाढीची पूर्तता करण्यासाठी एकूण 76 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे मुंबई, नागपूर, करमळी, तिरुवनंतपुरम, मंगळुरू तसेच पुणे–नागपूर, अमरावती आणि सांगानेर या लोकप्रिय मार्गांवरील प्रवास अधिक सुकर होणार आहे. 

27
मुंबई–करमळी दैनिक स्पेशल, 36 फेऱ्यांतून सुटसुटीत प्रवास

यातील सर्वाधिक फेऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–करमळी या दैनिक विशेष गाडीच्या असून, 36 फेऱ्या धावणार आहेत.

कालावधी : 19 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026

गाड्या : 01151 आणि 01152 (दररोज)

या गाड्यांना कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे दिले असून वातानुकूलित व सामान्य श्रेणींसह विस्तृत कोच संरचना उपलब्ध आहे. 

37
एलटीटी–तिरुवनंतपुरम उत्तर साप्ताहिक विशेष, दक्षिणेकडील प्रवाशांसाठी खास

या मार्गावर 8 विशेष फेऱ्या धावतील.

सुरुवात : 18 डिसेंबर 2025

समारोप : 10 जानेवारी 2026

गाड्या : 01171 (गुरुवार) सुटणारी व 01172 (शनिवार) परतणारी

ही सेवा कोकण–कर्नाटक–केरळ मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांना कव्हर करणार आहे. 

47
एलटीटी–मंगळुरू जंक्शन विशेष, 8 फेऱ्यांची लोकप्रिय सेवा

16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या गाडीचे क्रमांक 01185 आणि 01186 असून साप्ताहिक फेऱ्यांतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वातानुकुलित कोचेस आणि पॅन्ट्रीकारसह विस्तारित सुविधा या मार्गाला अधिक सक्षम बनवतील. 

57
नागपूर, सांगानेर, अमरावती मार्गांसाठीही 6–6 विशेष सेवा

राज्यातील मोठ्या शहरांना जोडणाऱ्या

सीएसएमटी–नागपूर

पुणे–नागपूर

पुणे–सांगानेर

पुणे–अमरावती

या मार्गांसाठीही प्रत्येकी 6 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिवाळी पर्यटन, कुटुंब भेटी आणि नाताळ–नववर्ष सेलिब्रेशनसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. 

67
आरक्षण सुरू, प्रवासाची माहिती एका क्लिकवर

या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण IRCTC तसेच सर्व रेल्वे आरक्षण केंद्रांवर सुरू झाले आहे.

अनारक्षित कोच तिकिटे UTS अॅपद्वारे उपलब्ध आहेत.

वेळापत्रक, थांबे, बदल आणि लाइव्ह अपडेट्स NTES अॅपवर पाहता येतील. 

77
उत्सवात गर्दीकडे टेन्शन नाही, मध्य रेल्वेची मोठी भेट

नाताळ आणि नववर्ष काळातील प्रवासी ताण कमी करून सुरक्षित, सोयीस्कर आणि निर्बाध प्रवासाची खात्री देण्यासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या या 76 विशेष सेवांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories