सावधान! नवीन फ्लॅट घेताय? 'कार्पेट' आणि 'बिल्ट-अप'चा हा खेळ समजून घ्या, नाहीतर कष्टाची कमाई डुबणार!

Published : Jan 12, 2026, 08:42 PM IST

How To Calculate Flat Area : नवीन फ्लॅट खरेदी करताना बिल्डर अनेकदा बिल्ट-अप एरिया सांगून ग्राहकांची फसवणूक करतात. कार्पेट एरिया (प्रत्यक्ष वापराची जागा) आणि बिल्ट-अप एरिया (भिंतींसहित जागा) यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

PREV
16
सावधान! नवीन फ्लॅट घेताय? 'कार्पेट' आणि 'बिल्ट-अप'चा हा खेळ समजून घ्या

Property News : स्वतःचं हक्काचं घर घेणं हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं सर्वात मोठं स्वप्न असतं. आयुषभराची पुंजी जमा करून आपण फ्लॅट बुक करतो. पण, तुम्ही ज्या घरासाठी लाखो-करोडो रुपये मोजताय, ते प्रत्यक्षात किती मोठं आहे? बिल्डरने सांगितलेलं क्षेत्रफळ आणि तुम्हाला प्रत्यक्षात मिळणारी जागा यात मोठी तफावत असू शकते. याच ठिकाणी ग्राहकांची मोठी फसवणूक होते, ज्याला आपण तांत्रिक भाषेत 'क्षेत्रफळाचा स्कॅम' म्हणू शकतो. 

26
बिल्ट-अप एरिया (Built-up Area) म्हणजे काय?

फ्लॅटच्या जाहिरातींमध्ये 'बिल्ट-अप एरिया' हा शब्द मोठ्या अक्षरात लिहिला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर, घराच्या बाहेरील भिंती धरून जे एकूण बांधकाम असतं, त्याला बिल्ट-अप एरिया म्हणतात. यामध्ये तुमच्या घराच्या भिंतींची जाडी, बाल्कनी आणि कधीकधी घराबाहेरील पॅसेजचा काही भागही मोजला जातो. 

36
कार्पेट एरिया (Carpet Area) तुमच्या हक्काची जागा!

'कार्पेट एरिया' म्हणजे ती जागा जिथे तुम्ही प्रत्यक्ष चटई (Carpet) अंथरू शकता. म्हणजेच, घराच्या चार भिंतींच्या आतील मोकळी जागा. यात बेडरूम, हॉल, किचन, टॉयलेट आणि घरातील अंतर्गत पॅसेजचा समावेश होतो. लिफ्ट, सामायिक जिने किंवा क्लब हाऊसचा भाग यात येत नाही. खरेदी करताना तुम्ही फक्त कार्पेट एरियाचेच पैसे मोजत आहात का, हे तपासणं गरजेचं आहे. 

46
बिल्डरचा 'टक्केवारी'चा खेळ आणि ग्राहकांची फसवणूक

अनेकदा बिल्डर कार्पेट एरियावर २०% ते ३०% 'लोडिंग' लावून बिल्ट-अप एरिया सांगतात.

उदाहरण: जर एखाद्या फ्लॅटचा कार्पेट एरिया ५०० स्क्वेअर फूट असेल, तर बिल्डर तो ६०० किंवा थेट ६५० स्क्वेअर फूट सांगून विकतो.

ग्राहकाला वाटतं की चौरस फुटाचा दर कमी आहे, पण प्रत्यक्षात त्याच्या हाती येणारी जागा ही बिल्डरने सांगितलेल्या आकड्यापेक्षा खूपच कमी असते. 

56
फसवणूक टाळण्यासाठी 'या' ४ गोष्टी नक्की करा

१. करारनामा (Agreement) नीट वाचा: स्वाक्षरी करण्यापूर्वी रेरा (RERA) नुसार कार्पेट एरिया किती दिला आहे, हे तपासा.

२. स्वतः मोजणी करा: शक्य असल्यास आर्किटेक्ट किंवा जाणकार व्यक्तीला सोबत घेऊन जागेची प्रत्यक्ष मोजणी करा.

३. रेरा वेबसाईटवर पडताळणी: संबंधित प्रोजेक्टची रेरा नोंदणी तपासा, तिथे अधिकृत कार्पेट एरियाची माहिती दिलेली असते.

४. स्पष्ट संवाद: बिल्डरला स्पष्ट विचारा की, मी ज्या किमतीवर सही करतोय त्यात मला किती 'नेट कार्पेट' एरिया मिळणार आहे? 

66
तुमची सतर्कताच तुम्हाला आर्थिक फसवणुकीपासून वाचवते

घराचा ताबा मिळाल्यावर घर लहान वाटू लागलं की पश्चात्ताप करण्यापेक्षा, खरेदी करण्यापूर्वीच डोळसपणे विचार करा. तुमची सतर्कताच तुम्हाला मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकते.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories