Car Rules: भारतात सरकारने जुन्या गाड्यांसाठी नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल आणि 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल गाड्यांवर सरकारचं लक्ष आहे. फिटनेस टेस्ट आणि स्क्रॅप पॉलिसीची आता कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.
अनेकजण आपली जुनी गाडी सुरू होते म्हणून वापरत राहतात. पण नव्या नियमांनुसार, गाडी फक्त चालण्यायोग्य असून चालणार नाही, तर तिने फिटनेसचे निकषही पूर्ण केले पाहिजेत. 15 वर्षे जुनी पेट्रोल कार आणि 10 वर्षे जुनी डिझेल कार रस्त्यावर चालवण्यासाठी फिटनेस टेस्ट अनिवार्य आहे. गाडी या टेस्टमध्ये फेल झाल्यास तिला 'अनफिट' घोषित केलं जातं आणि रस्त्यावर चालवणे बेकायदेशीर ठरतं.
25
फिटनेस टेस्ट इतकी महत्त्वाची का?
फिटनेस टेस्टमध्ये गाडीतून निघणारा धूर, इंजिनची स्थिती, ब्रेक आणि सेफ्टी फीचर्स तपासले जातात. गाडी जास्त प्रदूषण करत असेल किंवा तिच्यात सुरक्षेची पुरेशी सोय नसेल, तर तिला फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही. सरकारने अलीकडेच टेस्टची फी आणि री-रजिस्ट्रेशनचा खर्चही वाढवला आहे. त्यामुळे अनेकजण जुनी गाडी चालवण्यापेक्षा स्क्रॅप करणे पसंत करत आहेत.
35
स्क्रॅप केल्यास काय फायदा?
सरकारच्या व्हेईकल स्क्रॅप पॉलिसीनुसार, तुम्ही जुनी गाडी अधिकृत स्क्रॅप सेंटरमध्ये दिल्यास तुम्हाला काही फायदे मिळतात. स्क्रॅप सर्टिफिकेटच्या आधारे नवीन गाडी खरेदी करताना डिस्काउंट आणि टॅक्समध्ये सूट मिळू शकते. तसेच, जुन्या गाडीच्या दुरुस्तीचा खर्च आणि मेंटेनन्सच्या त्रासातूनही सुटका होते.
सध्या बाजारात येणाऱ्या नवीन गाड्यांमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स, कमी प्रदूषण आणि जास्त मायलेज मिळतं. यामुळे गाडीच्या इंधनावरील खर्चही कमी होतो. रस्त्यांवर प्रदूषण करणाऱ्या जुन्या गाड्यांची संख्या कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे तुमच्या गाडीचे वय ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाले असेल, तर वेळीच योग्य निर्णय घ्या.
55
जुन्या गाडी मालकांनी काय करावं?
तुमच्या गाडीला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत का किंवा तिच्यात फिटनेसच्या समस्या आहेत का, हे तपासा. गरज वाटल्यास फिटनेस टेस्ट करून घ्या. गाडी टेस्टमध्ये फेल झाल्यास, कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी वेळीच स्क्रॅप प्रक्रिया सुरू करा. अन्यथा, तुम्हाला मोठा दंड आणि रजिस्ट्रेशन रद्द होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .