Car Market: टाटा नॅनोपेक्षाही स्वस्त इलेक्ट्रिक कार! फक्त 2 मिनिटांत बॅटरी बदला!

Published : Jun 12, 2026, 09:55 PM IST

Car Market: नवी स्टार्टअप कंपनी Blinq Mobility लवकरच एक परवडणारी इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजी असलेली ही कार एका चार्जमध्ये 250 किमीची रेंज देईल आणि फक्त 2 मिनिटे 48 सेकंदात तिची बॅटरी बदलता येईल.

PREV
16
बाजारात येतेय नवी ईव्ही कार
लवकरच एक अत्यंत परवडणारी इलेक्ट्रिक कार बाजारात येणार आहे. Blinq Mobility या नव्या स्टार्टअप कंपनीने हे ईव्ही मॉडेल तयार केलंय. ही कार एका चार्जवर 250 किलोमीटरची रेंज देईल. विशेष म्हणजे, फक्त 2 मिनिटे 48 सेकंदात तिची बॅटरी बदलता येते. या गाडीची किंमत ऑटो-रिक्षाच्या आसपास असेल असा अंदाज आहे.
26
बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजी
या गाडीला सुपरचार्ज करण्याची गरज नाही, हेच तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या स्टार्टअप कंपनीने बॅटरी स्वॅपिंग (बदलण्याची) टेक्नॉलॉजीचा उत्तम वापर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार लाँच झाल्यावर बाजारातील सर्वात स्वस्त कार ठरू शकते. स्वॅपिंगच्या पर्यायामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.
36
कंपनीने गाडीला अधिकृत नाव दिलेले नाही
कंपनीने अजून या कारचं अधिकृत नाव जाहीर केलेलं नाही. 'Cartoq' वेबसाइटने या गाडीला 'Car001' असं कोडनेम दिलं आहे. कंपनीने नुकताच एका यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ही कार तयार होत असल्याचं दिसतंय. गाडीत एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम असून, बॅटरी कमी झाल्यावर ती अलर्टही देते.
46
टाटा नॅनो मॉडिफाइड लूक
ही एक छोटी कार असून तिचा लूक काहीसा टाटा नॅनोसारखा आहे. यात LED हेडलॅम्प, ग्लॉस ब्लॅक फ्रंट स्ट्रीप आणि कंपनीचा लोगो दिसतो. ही कार कंपोझिट मटेरियल वापरून बनवली आहे, त्यामुळे तिचं वजनही कमी असेल. स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर तयार केलेली ही कार ट्रॅफिकमध्ये सहज चालवता येईल.
56
5 लोकांचा आरामदायी प्रवास
या कारमध्ये 5 प्रवासी आरामात बसू शकतात. गाडीत आरामदायी सीटिंग, क्लीन फिनिश आणि शांत केबिन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. डॅशबोर्डवरील रोटरी कंट्रोलरच्या मदतीने 'Swap' किंवा 'S' मोड सुरू करता येतो. यात प्रीमियम टच आणि प्रॅक्टिकल स्टोरेजची सोयही दिली आहे.
66
252 किलोमीटर रेंज
रिपोर्ट्सनुसार, या कारचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 252 किमीची रेंज दाखवतो. बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीमुळे 250 किमीपेक्षा जास्त रेंज मिळेल. बॅटरी फक्त 2 मिनिटे 48 सेकंदात बदलता येते. कंपनीने दावा केला आहे की या कारची किंमत ऑटो-रिक्षापेक्षाही कमी असेल.
Read more Photos on

Recommended Stories