Stress Leaderboard: बंगळूरमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने एक भन्नाट प्रयोग केला. आपल्याला सर्वाधिक मानसिक ताण कोणामुळे येतो, हे शोधण्यासाठी त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक 'लीडरबोर्ड' तयार केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.
पंकज नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने ऑफिसमध्ये सर्वाधिक ताण कोणामुळे येतो, हे शोधायचं ठरवलं. यासाठी त्याने 'Whoop' फिटनेस ट्रॅकर आणि ऑफिस कॅलेंडर एकत्र जोडलं. 'Fable' नावाच्या टूलच्या मदतीने त्याने हार्ट रेट डेटा मिळवला. प्रत्येक मिनिटाला बदलणाऱ्या हार्ट रेटची तुलना त्याने मीटिंगच्या वेळा आणि त्यात सहभागी लोकांच्या नावांसोबत केली. यावरूनच त्याने सर्वाधिक स्ट्रेस देणाऱ्या लोकांचा एक 'लीडरबोर्ड' तयार केला.
22
इंटरनेटवर आयडिया व्हायरल
पंकजची ही भन्नाट आयडिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत. एका युझरने लिहिलं, 'ही खूप भारी आयडिया आहे, मलाही हे करायचं आहे.' तर दुसऱ्याने म्हटलं, 'तुमच्या तणावाला डेटा लीडरबोर्डमध्ये बदलणं हे विलक्षण आहे!' मात्र, काही जणांनी मीटिंगशिवाय जेवण, हालचाल यांसारख्या गोष्टींमुळेही हार्ट रेट वाढू शकतो, असा इशारा दिला आहे. बंगळूरमधील टेक प्रोफेशनल्सचे असे हटके प्रयोग नेहमीच इंटरनेटवर व्हायरल होतात. हा एक गंमतीशीर प्रकार वाटत असला तरी, कामाच्या ठिकाणी येणाऱ्या तणावाला सामोरं जाण्याचा हा एक नवीन दृष्टिकोन मानला जात आहे.