Car Market: एप्रिलमध्ये गाड्यांचा धुमाकूळ! पाहा कोणी मारली बाजी, टॉप 10 लिस्ट

Published : May 07, 2026, 09:50 PM IST

Car Market: एप्रिल महिन्याचा कार विक्रीचा रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये मारुती सुझुकीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे, तर ह्युंदाई, किया आणि रेनॉसारख्या कंपन्यांनीही चांगली कामगिरी केली आहे.

PREV
13
टाटा मोटर्स
टाटा मोटर्सने यावेळी दुसरं स्थान पटकावलं आहे. कंपनीने वार्षिक 30.5% वाढ मिळवली आहे. टाटा नेक्सॉन आणि पंच हे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल्स आहेत. तर, महिंद्रा कंपनी एप्रिल 2026 मध्ये 56,331 युनिट्स विकून भारतातील तिसरी मोठी कार उत्पादक कंपनी बनली आहे. कंपनीने 8% वार्षिक वाढ नोंदवली असली तरी, मासिक विक्रीत 6.5% घट झाली आहे. थार ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.
23
ह्युंदाई मोटर इंडिया
ह्युंदाई मोटर इंडियाने एप्रिल 2026 मध्ये 51,902 युनिट्स विकून चौथं स्थान मिळवलं आहे. ही 17% वार्षिक वाढ आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने 30,159 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या एप्रिल 2025 च्या तुलनेत 21% जास्त आहे. किया इंडियाने 27,286 युनिट्स विकून सहावं स्थान पटकावलं आहे. ही त्यांची एप्रिल महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.
33
JSW MG मोटर आणि होंडा कार्स इंडिया
JSW MG मोटर आणि होंडा कार्स इंडिया यांनी अनुक्रमे 6,018 आणि 4,069 युनिट्स विकून सातवं आणि आठवं स्थान मिळवलं आहे. तर रेनॉ कंपनीसाठी एप्रिल 2026 हा महिना फायदेशीर ठरला. कंपनीने एकूण 5,413 युनिट्स विकून वार्षिक 108% वाढ नोंदवली आहे. नव्याने लाँच झालेली रेनॉ डस्टर या वाढीमागे प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जातं. निसान इंडियाने एप्रिल 2026 मध्ये 3,203 युनिट्स विकून 45.5% वार्षिक वाढ नोंदवली आहे.
Read more Photos on

Recommended Stories