Bike Market: Yamaha Motor India ने आपल्या लोकप्रिय R15 सिरीजच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. या बाईक्स आता किती रुपयांनी महाग झाल्या आहेत, याची सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात
यामाहा मोटर इंडियाने R15S, R15 V4 आणि टॉप-स्पेक R15M सह सर्व व्हेरिएंटच्या किंमती सुमारे 4,900 रुपयांनी वाढवल्या आहेत. या दरवाढीमुळे, R15 बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता १.७१ लाख रुपये झाली आहे. तर, टॉप-स्पेक मॉडेल R15M ची एक्स-शोरूम किंमत 1.96 लाख रुपये आहे.
24
भारताची आवडती स्पोर्ट्स बाईक
भारतात सर्वाधिक पसंतीच्या स्पोर्ट्स बाईक्समध्ये यामाहा R15 ला नेहमीच खास स्थान आहे. R15 V4 मॉडेलमध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. व्हेरिएंटनुसार याची किंमत आता 1.71 लाख ते 1.76 लाख रुपयांपर्यंत आहे. ही किंमत आधीच्या दरापेक्षा 4,900 रुपयांनी जास्त आहे. V4 व्हेरिएंटमध्ये अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि काही मॉडेल्समध्ये क्विकशिफ्टरचा पर्यायही मिळतो, ज्यामुळे बाईकची कामगिरी आणखी सुधारते.
34
व्हेरिएंटनुसार किंमत
या सिरीजमधील R15M हे टॉप मॉडेल आहे. याची किंमत आता 1.86 लाख ते 1.96 लाख रुपयांपर्यंत आहे. या प्रीमियम मॉडेलमध्ये कलर TFT डिस्प्ले, स्टँडर्ड क्विकशिफ्टर आणि यामाहाच्या R1 सुपरबाईकसारखी खास स्टायलिंग देण्यात आली आहे. संपूर्ण R15 सिरीजमध्ये 155 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे 18.4 bhp पॉवर आणि 14.2 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
सर्व व्हेरिएंट्समध्ये मुख्य चेसिस, ब्रेकिंग सिस्टीम आणि एकूण कामगिरीची वैशिष्ट्ये सारखीच आहेत. या दरवाढीमुळे बाईक थोडी महाग झाली असली तरी, यामाहा R15 तिच्या सेगमेंटमधील एक उत्तम स्पोर्ट्स बाईक आहे. उत्तम परफॉर्मन्स, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनमुळे तरुणांमध्ये आजही ही बाईक 'हॉट चॉइस' आहे.