
एखादा सामान्य माणूस शोरूममध्ये नवीन बाईक घ्यायला गेला की त्याचा पहिला प्रश्न असतो, 'मायलेज किती देते?' वाढत्या किमती आणि पेट्रोलच्या खर्चामुळे बाईकचा मेंटेनन्स महाग झालाय. तरीही बाईक्सची मागणी कमी झालेली नाही. ताज्या आकडेवारीनुसार, 2026 या आर्थिक वर्षापर्यंत भारतीय टू-व्हीलर मार्केट 8 ते 9 टक्क्यांनी वाढणार आहे. या वाढीत एन्ट्री-लेव्हल कम्युटर बाईक्सचा वाटा सर्वात जास्त असेल. चला, तर मग कमी किंमत, उत्तम मायलेज आणि कमी देखभालीच्या बेस्ट बाईक्स पाहूया.
कमी किमतीच्या बाईक्सचं नाव काढलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे हिरो स्प्लेंडर. यात 97.2cc चं इंजिन आहे. या ,बाईकवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. **किंमत:** याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 75,600 ते 85,000 रुपयांपर्यंत आहे. **मायलेज:** ही बाईक एका लीटर पेट्रोलमध्ये साधारणपणे 70 ते 80 किलोमीटरचं मायलेज देते. **देखभाल:** हिचा वार्षिक देखभाल खर्च फक्त 6,500 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान आहे. तिचे स्पेअर पार्ट्स देशात कुठेही सहज मिळतात.
रोज जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी, विशेषतः खराब रस्त्यांवरून फिरणाऱ्यांसाठी प्लॅटिना एक बेस्ट ऑप्शन आहे. **किंमत:** याची किंमत 65,000 ते 78,000 रुपयांच्या दरम्यान आहे. **मायलेज:** रायडरचं वजन आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार ही बाईक एका लीटरमध्ये 70 ते 85 किलोमीटरचं मायलेज देते. **खासियत:** यातलं 'कम्फर्टेक' (ComforTec) तंत्रज्ञान आणि लांब सस्पेन्शनमुळे खडबडीत रस्त्यांवरही प्रवास आरामदायक होतो. थकवा जाणवत नाही.
अगदी कमी बजेटमध्ये बेस्ट बाईक हवी असेल, तर हा एक योग्य पर्याय आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त नवीन बाईक्सपैकी एक आहे. **किंमत:** याची किंमत सुमारे 58,600 ते 72,000 रुपयांच्या दरम्यान आहे. **मायलेज:** यात स्प्लेंडरमध्ये वापरलेलं 97.2cc चं इंजिनच आहे. त्यामुळे ही बाईक सहजपणे 70-75 किमी मायलेज देते. **देखभाल:** स्प्लेंडरचं इंजिन असल्यामुळे याचे स्पेअर पार्ट्स कुठेही मिळतात. अगदी लहान खेड्यापाड्यातील मेकॅनिकसुद्धा ही बाईक सहज दुरुस्त करतात.
कमी बजेटमध्ये मजबूत आणि किफायतशीर बाईक म्हणून टीव्हीएस स्पोर्टची चांगली ओळख आहे. **किंमत:** याची किंमत सुमारे 59,900 ते 69,800 रुपयांच्या दरम्यान आहे. **मायलेज:** हिचं 109.7cc चं इंजिन खरंतर रस्त्यावर 65-70 किमी मायलेज देतं. **खासियत:** कमी वजन आणि परवडणारी किंमत यामुळे सिटी ट्रॅफिकमध्ये चालवण्यासाठी आणि पहिल्यांदा बाईक घेणाऱ्यांसाठी हे एक उत्तम पॅकेज आहे.
होंडाच्या बाईक्स त्यांच्या इंजिनच्या क्वालिटी आणि रिफाइनमेंटसाठी ओळखल्या जातात. शाईन 100 याच वैशिष्ट्यांसह एन्ट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये उतरली आहे. **किंमत:** या बाईकची किंमत सुमारे 65,700 ते 74,000 रुपयांच्या दरम्यान आहे. **मायलेज:** हिचं 98.98cc चं इंजिन सहजपणे 65-70 किमी मायलेज देतं. **खासियत:** हिची सायलेंट स्टार्टर मोटर आणि स्मूथ पॉवर डिलिव्हरीमुळे रोजचा प्रवास खूपच आरामदायक होतो.
नवीन बाईक नेहमी तुमच्या वैयक्तिक गरजा आणि रोजच्या प्रवासाचा विचार करूनच निवडा. तुम्हाला कमी मेंटेनन्स आणि जास्त रिसेल व्हॅल्यू हवी असेल, तर हिरो स्प्लेंडर प्लस किंवा एचएफ डिलक्स बेस्ट ऑप्शन आहेत. खडबडीत रस्त्यांवर आरामदायी प्रवासासाठी बजाज प्लॅटिना योग्य आहे. तर स्मूथ रायडिंग अनुभवासाठी होंडा शाईन 100 एक चांगली गुंतवणूक ठरू शकते. लक्षात ठेवा, तुम्ही कोणतीही बाईक निवडली तरी, तिची वेळेवर सर्व्हिसिंग केली तरच उत्तम मायलेज मिळेल. एअर फिल्टरसारखे भाग वेळोवेळी स्वच्छ करायला हवेत.