Car Market: या SUV ने मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत एक नवीन रेकॉर्ड केला आहे, ज्यामुळे भारतीय कुटुंबांचं लक्ष वेधलं गेलं आहे. क्रॅश टेस्टमध्येही या गाडीने जबरदस्त कामगिरी केली आहे.
कुटुंबासोबत प्रवासाला निघताना भारतीय ग्राहक आता मायलेज नाही, तर सेफ्टीला पहिलं प्राधान्य देतात. त्यातही लहान मुलं सोबत असतील, तर 'ही गाडी किती सुरक्षित आहे?' हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा ठरतो. याच बाबतीत, किया सेल्टॉस (Kia Seltos) ही SUV मुलांच्या सुरक्षेमध्ये सर्वोत्तम ठरली आहे. भारताची सेफ्टी रेटिंग एजन्सी BNCAP च्या टेस्टमध्ये या गाडीने आपली मजबूत बांधणी सिद्ध केली आहे.
25
मुलांसाठी अचूक सेफ्टी फीचर्स
मुलांच्या सुरक्षेच्या (Child Safety) कॅटेगरीत किया सेल्टॉसने एकूण ४९ पैकी तब्बल ४५ गुण मिळवून आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, डायनॅमिक टेस्टमध्ये गाडीला २४ पैकी २४ गुण मिळाले. तसेच, चाईल्ड सीट इन्स्टॉलेशनमध्येही १२ पैकी १२ गुण मिळाल्याने, मुलांसाठीचे सेफ्टी फीचर्स किती अचूक आहेत हे सिद्ध झालं आहे. ही SUV खास कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन बनवली आहे, असं ऑटो एक्सपर्ट्सचं मत आहे.
35
क्रॅश टेस्टमध्येही उत्तम कामगिरी
BNCAP ने 18 महिन्यांच्या आणि 3 वर्षांच्या मुलांच्या डमीसोबत केलेल्या क्रॅश टेस्टमध्येही किया सेल्टॉसने उत्तम कामगिरी केली. समोरून किंवा बाजूने होणाऱ्या धडकेत मुलांना कमीत कमी इजा होईल, अशाप्रकारे गाडीची सेफ्टी सिस्टीम काम करते, असं BNCAP ने म्हटलं आहे. त्यामुळे, मुलांसोबत लांबच्या प्रवासाला जाणाऱ्यांचं लक्ष आता या SUV कडे वळलं आहे.
सुरक्षेसोबतच, किया सेल्टॉस डिझाइन आणि फीचर्समध्येही खास आहे. गाडीत मॉडर्न इन्फोटेनमेंट सिस्टीम, ADAS टेक्नॉलॉजी, अनेक एअरबॅग्ज आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारख्या सुविधा मिळतात. या फीचर्समुळे ही SUV एका प्रीमियम गाडीचा फील देते. शहरातल्या वापरासाठी आणि लांबच्या हायवे प्रवासासाठी ही एक उत्तम SUV मानली जाते.
55
विश्वासार्ह SUV
भारतीय बाजारात किया सेल्टॉस SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये आहे. ज्या कुटुंबांना एकाच गाडीत सेफ्टी, स्टाईल आणि टेक्नॉलॉजी हवी आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. 'कुटुंबाच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड नाही' असं मानणाऱ्या ग्राहकांसाठी किया सेल्टॉस आता एक विश्वासार्ह SUV म्हणून समोर आली आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .