Kitchen Tips: तुमची ज्वारीची भाकरी लाटताना कडेने तुटते का? किंवा कडक होते का? मग आता चिंता सोडा. पीठ मळताना फक्त एक सोपी ट्रिक वापरा आणि हॉटेलसारखी मऊ, लुसलुशीत ज्वारीची भाकरी घरच्या घरी बनवा. ही भाकरी लाटताना अजिबात तुटणार नाही.
ज्वारीच्या पिठात ग्लूटेन नसल्याने भाकरीला चिरा पडतात. पण योग्य पद्धत वापरल्यास तुम्ही चपातीपेक्षाही मऊ भाकरी बनवू शकता. हॉटेलसारखी भाकरी बनवण्यासाठी या टिप्स नक्की वापरा.
24
मऊ ज्वारीची भाकरी कशी बनवायची
मऊ भाकरीसाठी पीठ नेहमी उकळत्या गरम पाण्यानेच मळा. यामुळे पिठात चिकटपणा येतो आणि भाकरी लाटताना तुटत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे.
34
असं मळा पीठ
गरम पाण्यात पीठ मिसळल्यावर आधी चमच्याने एकत्र करा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताने कमीतकमी 5 मिनिटे चांगले मळून घ्या. पीठ जितके मऊ, भाकरी तितकीच उत्तम होते.
भाकरी तव्यावर टाकल्यावर, त्यावर ओल्या फडक्याने किंवा हाताने थोडे पाणी लावा. यामुळे भाकरी कोरडी होत नाही. भाकरी नेहमी मध्यम ते मोठ्या आचेवर भाजा. मंद आचेवर ती कडक होते.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .