Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयाने आयटी क्षेत्रातील तरुणांसाठी सिस्टिम ऑफिसर, सिनियर सिस्टिम ऑफिसर पदांसाठी ८३ जागांची भरती जाहीर केली. या पदांसाठी नोकरीची संधी मिळत असून, विशेष म्हणजे यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयात ८३ जागांसाठी मेगा भरती! ₹४६,००० पगार आणि अर्ज शुल्कही नाही
मुंबई : नवीन वर्षात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या आयटी (IT) क्षेत्रातील तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने आनंदाची बातमी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
26
रिक्त पदांचा तपशील
मुंबई उच्च न्यायालयाने एकूण ८३ जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सिस्टिम ऑफिसर (System Officer): ५४ पदे
सिनियर सिस्टिम ऑफिसर (Senior System Officer): २९ पदे
36
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
दोन्ही पदांसाठी उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
शिक्षण: B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics) किंवा MCA पदवी.
अतिरिक्त प्रमाणपत्रे: नेटवर्क प्रमाणपत्र (MCSE / RHCE) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (Red Hat Enterprise Linux) चे ज्ञान.
अनुभव: सिस्टिम ऑफिसरसाठी: किमान ०१ वर्षाचा अनुभव.
सिनियर सिस्टिम ऑफिसरसाठी: किमान ०५ वर्षांचा अनुभव.