बिग बॉस फेम अभिनेत्री रिशा गौडाने बंगळुरू बसमध्ये तिच्यासोबत झालेल्या एका धक्कादायक प्रकाराबद्दल सांगितलंय. छेड काढणाऱ्या व्यक्तीच्या तिने कानाखाली लगावली. इतकंच नाही, तर अशा घटनांचा आणि महिलांच्या कपड्यांचा काहीही संबंध नसतो.
बस, ट्रेन किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी काही पुरुष महिलांना मुद्दाम स्पर्श करून आपली विकृत इच्छा पूर्ण करतात. अनेकदा गर्दीचा फायदा घेतला जातो. काही महिला गप्प बसून त्रास सहन करतात, तर काहीजणी अशा लोकांना चांगलाच धडा शिकवतात.
26
एअरपोर्टवरील अनुभव
असाच एक अनुभव बिग बॉस फेम अभिनेत्री रिशा गौडाला (Bigg Boss Risha Gowda) आला. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने बंगळुरूच्या एअरपोर्ट बसमध्ये तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग सांगितला.
36
फक्त कंडक्टर मदतीला धावून आले
रिशा म्हणाली, 'मी टॉप आणि जीन्स घालून एअरपोर्ट बसमध्ये चढले होते. माझ्या मागे बसलेला एक माणूस मला वारंवार चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. मी थोडा वेळ सहन केलं आणि मग थेट त्याच्या कानाखाली लगावली. पण बसमधले इतर पुरुष प्रवासी काहीही न करता फक्त बघत राहिले. फक्त कंडक्टर मदतीला धावून आले'.
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'अशा घटना घडल्या की नेहमी महिलांच्या कपड्यांवरून बोललं जातं. पण त्याचा आणि या घटनांचा काहीही संबंध नाही. म्हणूनच मी जीन्स आणि नॉर्मल टॉप घातला होता हे मुद्दाम सांगितलं. अशा विकृत लोकांना साडी, सलवार किंवा चुडीदार घातलेल्या महिलांचीही छेड काढण्यापासून काही फरक पडत नाही. इथे महिलांना सुरक्षाच नाही'.
56
कर्नाटक किंवा भारतात कुठेही महिला सुरक्षित नाहीत
रिशाच्या मते, अशा परिस्थितीत इतर पुरुषांनीही मदतीसाठी पुढे यायला हवं, पण तसं होताना दिसत नाही. 'कर्नाटक किंवा भारतात कुठेही महिला सुरक्षित नाहीत,' असं सांगताना तिने दुबईमधला तिचा एक अनुभव सांगितला.
66
रिशा काय म्हणाली?
रिशा म्हणाली, 'दुबईमध्ये रात्री ३ वाजताही एकटी मुलगी बिनधास्त फिरू शकते. पण इथे रात्री ९ नंतर बाहेर जाणंही कठीण आहे. परदेशांप्रमाणे आपल्याकडे महिलांना सुरक्षा नाही. त्यातही कर्नाटकात तर महिलांनी फक्त स्वयंपाकघरातच काम करावं, अशी मानसिकता अजूनही आहे. मुलांना जेवढे अधिकार आहेत, तेवढेच मुलींनाही आहेत, पण समाज हे स्वीकारायला तयार नाही,' असं तिने आपलं दुःख व्यक्त केलं.