यंदाच्या दिवाळीत तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करताय का? १ लाख रुपयांच्या बजेटमध्ये जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप बाईक्सची किंमत आणि फीचर्स आम्ही इथे दिले आहेत. या सर्व गाड्या तुमच्या खिशाला नक्कीच परवडतील.
कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांच्या लिस्टमध्ये ही बाईक नेहमीच पुढे असते. या गाडीचं वजन खूप कमी आहे. त्यामुळे ट्रॅफिक असलेल्या शहरातील रस्त्यांवर तुम्ही ती अगदी सहज चालवू शकता.
मायलेज - ही बाईक १ लिटर पेट्रोलमध्ये ८० किमीपर्यंत सर्टिफाईड मायलेज देते. तर सामान्य रस्त्यांवर तुम्हाला ७० किमीपर्यंत मायलेज मिळतं.
किंमत - या बाईकची एक्स-शोरूम किंमत ५९,१०० ते ५९,९५० रुपयांपर्यंत आहे.
फीचर्स - या गाडीत १०९.७ सीसी इंजिन आणि १० लिटरची पेट्रोल टाकी दिली आहे. या बाईकचं वजन ११२ किलो आहे.
24
बजाज प्लॅटिना १०० (Bajaj Platina 100)
मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आणि रोज जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक अतिशय लोकप्रिय बाईक आहे. तुम्ही कितीही किलोमीटर प्रवास केला तरी कंबरदुखीचा त्रास होऊ नये, यासाठी कंपनीने याचं सस्पेन्शन सिस्टीम खूप स्मूथ बनवलं आहे.
मायलेज - ही बाईक १ लिटर पेट्रोलमध्ये ७५ किमीपर्यंत सर्टिफाईड मायलेज देते.
किंमत - या गाडीची एक्स-शोरूम किंमत जवळपास ७०,५११ रुपये आहे.
फीचर्स - या बाईकमध्ये ९९.५९ सीसी इंजिन आणि ११ लिटरची मोठी पेट्रोल टाकी मिळते. या गाडीचं वजन ११७ किलो आहे.
34
बजाज सीटी ११० (Bajaj CT 110)
खड्ड्यांच्या रस्त्यांवर चालवण्यासाठी आणि गावाकडे जास्त वजन वाहून नेण्यासाठी कंपनीने ही बाईक खूप मजबूत डिझाईन केली आहे.
मायलेज - ही गाडी १ लिटर पेट्रोलमध्ये ७० किमीपर्यंत सर्टिफाईड मायलेज देते. रोजच्या वापरात तुम्हाला ६० ते ७० किमीपर्यंत मायलेज सहज मिळतं.
किंमत - या बाईकची एक्स-शोरूम किंमत जवळपास ७४,९३० रुपये आहे.
फीचर्स - या गाडीत ११५.४५ सीसीचं पॉवरफुल इंजिन आणि ११ लिटरची पेट्रोल टाकी दिली आहे. या बाईकचं वजन १२४ किलो आहे.
बजेट किंमतीत थोडा स्टायलिश लूक, प्रीमियम फीचर्स आणि सेफ्टी हवी असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या गाडीत तुम्हाला फ्रंट डिस्क ब्रेकचा ऑप्शन सुद्धा मिळतो.
मायलेज - ही बाईक १ लिटर पेट्रोलमध्ये जवळपास ७० किमीपर्यंत चांगलं मायलेज देते.
किंमत - या गाडीची एक्स-शोरूम किंमत ७२,५०० ते ७५,२०० रुपयांच्या दरम्यान आहे.
फीचर्स - या बाईकमध्ये १०९.७ सीसी इंजिन आणि १० लिटरची पेट्रोल टाकी मिळते. या गाडीचं वजन ११५ किलो आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .