Published : Aug 06, 2025, 06:33 PM ISTUpdated : Aug 06, 2025, 06:36 PM IST
मुंबई - रक्षाबंधनाला तुम्ही बहिणीला काही तरी गिफ्ट देणार. पण यावेळी बायकोला विसरु नका. तिला ‘हे’ ५ गिफ्ट्स दिल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन तुमच्यावर धनवर्षाव करेल. कोणते आहेत ते ५ गिफ्ट्स? वाचा सविस्तर माहिती.
लोक लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. आर्थिक समस्या दूर व्हाव्यात, संपत्ती मिळावी असे त्यांना वाटते. पण ते घरच्या लक्ष्मीला, म्हणजेच बायकोला, कधीच खुश ठेवत नाहीत.
27
बायकोला खुश ठेवा
घरची लक्ष्मी म्हणजे बायको. जो पुरुष बायकोला खुश ठेवतो त्याच्यावर लक्ष्मीदेवी धनवर्षाव करते असे ज्योतिषी सांगतात. बायकोला खुश ठेवण्यासाठी ‘हे’ ५ गिफ्ट्स द्या.
37
पॉकेट मनी
तुमच्या कमाईतला काही भाग बायकोला पॉकेट मनी म्हणून द्या. घरच्या लक्ष्मीला तुमच्या पगारातील काही पैसे दिल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक प्रगती होईल.
कोणताही निर्णय घेताना बायकोशी चर्चा करा. ती तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. प्रत्येक निर्णयात तिला सहभागी करून घ्या. बायकोचा आदर केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होते.
57
शुक्रवारी गोडधोड खाऊ घाला
शुक्रवारी बायकोला पांढऱ्या रंगाचे गोडधोड खाऊ घाला. रसगुल्ले, रसमलाई, बर्फी, पेढे असे काहीही चालेल. पांढऱ्या रंगाचे गोडधोड लक्ष्मीदेवीला प्रिय असते.
67
बायकोला टोचून बोलू नका
काही पुरुषांना बायकोला सर्वांसमोर टोचून बोलण्याची सवय असते. पण बायकोला टोचून बोलणार्या पुरुषाच्या आयुष्यात लक्ष्मी येत नाही. त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बायकोला नेहमी खुश ठेवा.
77
स्वयंपाकघर भरलेले ठेवा
स्वयंपाकघरात नेहमी साहित्य साठवून ठेवा. कोणतीही वस्तू संपेल असे होऊ देऊ नका. तांदूळ, मीठ, साखर, डाळी या गोष्टी कमी झाल्या की लगेच आणून ठेवा. मीठ आणि तांदूळ कधीही संपू देऊ नका.