Astrology: या 4 राशींवर ग्रहण योगाचा वाईट प्रभाव, 2 दिवस सावध राहा नाहीतर...

Published : May 08, 2026, 09:44 PM IST

Astrology: ज्योतिषशास्त्रात ग्रहण योगाला खूप महत्त्व आहे, पण तो राशींसाठी अशुभ मानला जातो. आता पुन्हा एकदा ग्रहण योग तयार होणार आहे. त्यामुळे चार राशीच्या लोकांनी वेळीच सावध व्हायला हवं, नाहीतर त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

PREV
15
ग्रहण योग

ज्योतिषशास्त्रानुसार, वेळोवेळी ग्रहांच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होतो, जो अशुभ मानला जातो. येत्या 10 मे रोजी राहू आणि सूर्य ग्रहामुळे हा योग जुळून येत आहे. या योगाच्या अशुभ प्रभावापासून चार राशींची सुटका होणार नाही. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार राशी.

25
मेष रास

मे 2026 मध्ये तयार होणाऱ्या ग्रहण योगामुळे मेष राशीच्या लोकांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. इतकंच नाही, तर कामाच्या ठिकाणी बॉससोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार नाही.

35
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग प्रतिकूल ठरू शकतो. तुम्हाला रोजच्या आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. विशेषतः तुमच्या सामाजिक प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच, घाईगडबडीत घेतलेले निर्णय तुमचं नुकसान करू शकतात.
45
कन्या रास

10 मे रोजी होणारा ग्रहण योग कन्या राशीच्या लोकांसाठी अजिबात चांगला नाही. या काळात घाईने किंवा अविचारीपणे घेतलेले निर्णय मोठे नुकसान करू शकतात. आर्थिक फटका बसण्याचीही दाट शक्यता आहे.

55
कुंभ रास

मेष, सिंह आणि कन्या राशींप्रमाणेच 10 मे  रोजी तयार होणारा ग्रहण योग कुंभ राशीसाठीही अशुभ ठरेल. या काळात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. इतकंच नाही, तर तुमच्या जुन्या चुकांमुळे तणाव वाढू शकतो. प्रेमसंबंधांच्या बाबतीत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories