Car Market: कमी किमतीत चांगल्या गाड्यांच्या यादीत सिट्रोएन C3 ने आपलं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे. मारुती आणि रेनॉसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बाजारात आलेल्या या गाडीची सध्याची स्थिती आणि खास वैशिष्ट्ये काय आहेत, चला जाणून घेऊया.
उत्तम इंजिन: ही गाडी 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड (NA) आणि 1.2 लीटर टर्बो पेट्रोल अशा दोन पर्यायांमध्ये येते. दोन्ही इंजिन एकदम स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव देतात.
प्रवासातील आराम: गाडीची सस्पेन्शन सिस्टीम आणि ड्रायव्हिंगचा अनुभव खूपच भारी आहे.
किंमत: किमती वाढूनही, या गाडीची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी बजेट ग्राहकांसाठी एक मोठी संधी आहे.
24
Citroen C3 गाडीचे तोटे
फीचर्सची कमतरता: कमी किमतीत गाडी देण्यासाठी, सिट्रोएनने सुरुवातीला अनेक बेसिक फीचर्स वगळले होते. पण, आता त्यांनी काही बदल करून फीचर्स सुधारले आहेत.
विक्री आणि सर्व्हिस सेंटर्स: संपूर्ण भारतात फक्त 200 शोरूम्स असल्याने, ग्राहकांना सर्व्हिस सेंटरपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात.
34
महत्त्वपूर्ण तांत्रिक माहिती
व्हेरियंट्स: ही गाडी लाईव्ह (Live), फील (Feel) आणि शाईन (Shine) या तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.
परफॉर्मन्स: NA पेट्रोल इंजिन 82 hp पॉवर निर्माण करते, तर टर्बो पेट्रोल इंजिन 110 hp पॉवर देते.
गिअरबॉक्स: यात 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक (टॉर्क कन्व्हर्टर) असे पर्याय मिळतात.
ज्या लोकांना जास्त फीचर्सपेक्षा इंजिनची गुणवत्ता आणि ड्रायव्हिंगचा अनुभव महत्त्वाचा वाटतो, ते सिट्रोएन C3 निवडू शकतात. विशेषतः, तुमच्या घराच्या जवळ सिट्रोएनचं शोरूम किंवा सर्व्हिस सेंटर असेल, तर तुम्ही या गाडीचा नक्कीच विचार करू शकता.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .