Amazon Prime Day Sale च्या नादात 'या' लिंक्सवर चुकूही करू नका क्लिक, होईल फसवणूक

अ‍ॅमेझॉन प्राइमवर येत्या 20 जुलैपासून प्राइम डे सेल सुरु होणार आहे. याआधी सायबर हल्लेखोर अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. अशातच नागरिक सेलदरम्यानअधिकृत अ‍ॅप अथवा लिंकवरुनच खरेदी करावी. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

Chanda Mandavkar | Published : Jul 19, 2024 9:56 AM IST

Amazon Prime Day Sale : अ‍ॅमेझॉनवरील ‘प्राइम डे’ सेल येत्या 20 जुलै ते 21 जुलैदरम्यान सुरु राहणार आहे. अशातच बहुतांशजणांनी आतापर्यंत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन काय-काय खरेदी करायचे याची लिस्ट तयार करुन ठेवली असेल. पण सेलदरम्यान सायबर हल्लेखोर अधिक अ‍ॅक्टिव्ह होतात या गोष्टीकडेही तुम्ही लक्ष द्या. अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. यंदाच्या अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलसाठी सायबर हल्लेखोरांनी काही बनावट वेबसाइट्स आणि लिंक तयार केल्या आहेत. याच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून बँक खाती रिकामी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

सायबर हल्लेखोरांकडून 25 बनावट वेबसाइट लिंक तयार
सायबर हल्लेखोरांकडून अ‍ॅमेझॉनसंदर्भात 25 बनावट वेबसाइट लिंक तयार केल्या आहेत. याचा खुलासा सायबर सिक्युरिटी वेबसाइट चेकपॉइंट डॉट कॉम यांनी केली आहे. सायबर सिक्युरिटीने नागरिकांना पुढील काही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे.

या लिंक्सवर चुकूनही करू नका क्लिक

1. amazon-onboarding[.]com

2. amazonmxc[.]shop

3. amazonindo[.]com

4. shopamazon2[.]com

5. microsoft-amazon[.]shop

6. amazonapp[.]nl

7. shopamazon3[.]com

8. amazon-billing[.]top

9. amazonshop1[.]com

10. fedexamazonus[.]top

11. amazonupdator[.]com

12. amazon-in[.]net

13. espaces-amazon-fr[.]com

14. usiamazon[.]com

15. amazonhafs[.]buzz

16. usps-amazon-us[.]top

17. amazon-entrega[.]info

18. amazon-vip[.]xyz

19. paqueta-amazon[.]com

20. connect-amazon[.]com.

21. user-amazon-id[.]com

22. amazon762[.]cc

23. amazoneurosir.com

24. amazonw-dwfawpapf[.]top

25. amazonprimevidéo[.]com

अशाप्रकारे सायबर हल्लेखोर करतात बँक खाते रिकामे
सायबर हल्लेखोर बँक खाते रिकामे करण्यासाठी मेसेजचा वापर करतात. मेसेज नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम आणि ईमेलच्या माध्यमातून पाठवला जातो. यामध्ये शॉपिंग अ‍ॅपच्या नावाने ऑफर दिली जाते. एवढेच नव्हे बंपर सूटच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल केली जाते. मेसेजमध्ये हॅकर्सकडून एक बनावट लिंक देखील शेअर केली जातो. या लिंकच्या माध्यमातून हॅकर्स नागरिकांची फसवणूक केली जाते.

ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टीही ठेवा लक्षात

आणखी वाचा : 

Vi वापरकर्त्यांसाठी नवीन संकट, दर वाढवल्यानंतर Jio, Airtel सुद्धा देणार धक्का?

विना कागदपत्रांचा काढता येईल पासपोर्ट, फक्त 'हे' काम करा

Share this article