1. डिझाइन आणि डिस्प्ले
Echo Show 5 (3rd Gen) मध्ये 5.5 इंची स्मार्ट डिस्प्ले असून, आता Rounded Edges आणि Infinity Cover Glass यामध्ये समाविष्ट आहे. हे स्क्रीन रात्रीच्या वेळीही डोळ्यांना त्रास न देता स्पष्टपणे दिसते. यावरून वापरकर्ते हवामानाची माहिती, सिक्युरिटी कॅमेऱ्यांचे व्हिडीओ फीड्स, वर्कआउट व्हिडीओज, किंवा कॅलेंडर-टू डू लिस्ट सहज पाहू शकतात.
2. सुस्पष्ट आवाज
Echo Show 5 (3rd Gen) मध्ये आता नवीन 1.7 इंची रियर-फेसिंग स्पीकर आहे जो आधीच्या मॉडेलच्या तुलनेत दुहेरी बास आणि स्पष्ट आवाज देतो. म्युझिक, पॉडकास्ट, ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी हे उत्तम माध्यम ठरेल. हे डिव्हाईस Amazon Music, Apple Music, Spotify, JioSaavn, व Audible (सदस्यत्व आवश्यक) यांना सपोर्ट करते. याशिवाय, मल्टी-रूम म्युझिक फिचरद्वारे वापरकर्ते एकाच वेळी वेगवेगळ्या खोल्यांमधील Echo डिव्हाइसेसवर म्युझिक प्ले करू शकतात.
3. घराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी उपयोगी
Echo Show 5 च्या इनबिल्ट कॅमेऱ्यामुळे वापरकर्ते घराबाहेर असतानाही घराची देखरेख करू शकतात. "Drop-In" फिचरद्वारे ते थेट कनेक्ट होऊन घरातील स्थिती पाहू शकतात. "Alexa, show me the video doorbell" असे म्हटले की स्क्रीनवर डोअरबेल कॅमेऱ्याचे दृश्य दिसते. याशिवाय, Echo डिव्हाईस असलेल्या कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉल, मेसेजिंग किंवा इतर खोलीतील Echo वर जलद घोषणा पाठवता येतात.