Kitchen Makeover: किचनचा ओटा खराब झालाय? फक्त 150 रुपयांत द्या नवा लुक, पाहा 5 जबरदस्त डिझाइन्स

Published : May 21, 2026, 06:06 PM IST

Kitchen Slab Wallpaper: किचनचा ओटा वापरून वापरून तेलकट आणि डागाळलेला दिसू लागतो. प्रत्येक वेळी नवीन ओटा बसवणं खूप महाग पडू शकतं. पण आता कमी बजेटमध्येही तुम्ही किचनला एक नवीन आणि स्टायलिश लुक देऊ शकता.

PREV
16
सुमारे 150 रुपयांमध्ये मिळणारे हे फ्लोअर आणि स्लॅब वॉलपेपर तुमच्या जुन्या किचनला नवा लुक देतात. हे वॉटरप्रूफ, स्वच्छ करायला सोपे आणि लावायलाही खूप सोपे असतात. तुम्ही हे वॉलपेपर कॅबिनेट, फ्रीज किंवा टेबल अशा कोणत्याही पृष्ठभागावर वापरू शकता. हे कुठेही सहज चिकटतात आणि ट्रेंडी लुक देतात.
26
मार्बल फिनिशिंग वेवी वॉलपेपर
मार्बल फिनिश असलेले वेव्ही वॉलपेपर तुमच्या किचनच्या ओट्याला एकदम क्लासिक आणि प्रीमियम लुक देतात. जर तुमच्या ओट्याचं मार्बल खराब झालं असेल, तर तुम्ही 150 रुपयांपेक्षा कमी किमतीत हे वॉलपेपर खरेदी करू शकता. हे लावणं खूप सोपं आहे. फक्त वॉलपेपरच्या मागची शीट काढून थेट ओट्यावर किंवा भिंतीवर चिकटवा. चिकटवताना लाइनिंग सरळ राहील याची काळजी घ्या, म्हणजे फिनिशिंग चांगली दिसेल.
36
सी ग्रीन गोल्ड मार्बल वॉलपेपर
तुम्हाला जर किचनला लक्झरी लुक द्यायचा असेल, तर सी ग्रीन गोल्ड मार्बल वॉलपेपर एक उत्तम पर्याय आहे. यामुळे किचनला स्वच्छ आणि प्रीमियम फील येतो. हे वॉटरप्रूफ असल्यामुळे यावर पाणी किंवा हळदीचे डाग लागत नाहीत. फक्त एक काळजी घ्या, यावर थेट चाकू वापरू नका.
46
ग्रेनेट लुक वॉल पेपर
ग्रॅनाइटसारखा लुक देणारे हे वॉलपेपर अगदी खरे वाटतात. कमी खर्चात तुम्हाला महागड्या ओट्यासारखं फिनिशिंग मिळतं. तुम्ही हे वॉलपेपर काळ्या किंवा पांढऱ्या पॅटर्नमध्ये घेऊ शकता.
56
टेक्चसर वॉलपेपर

तुम्हाला किचनमध्ये काहीतरी वेगळं टेक्स्चर हवं असेल, तर या पॅटर्नचा वॉलपेपर लावा. यामुळे लहान जागासुद्धा अधिक आकर्षक आणि लक्षवेधी दिसते. तुम्ही हे फ्लोअर आणि भिंतीवर, दोन्ही ठिकाणी लावू शकता. हे वॉलपेपर 150 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात.

66
सिल्वर वॉलपेपर

सिल्व्हर वॉलपेपर तुमच्या किचनला खूप सुंदर आणि एस्थेटिक लुक देतो. तुम्ही ज्योमेट्रिक पॅटर्नमध्ये अशा प्रकारचे वॉलपेपर निवडू शकता. यामुळे तुमचा किचन ओटा अधिक स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतो. 

Read more Photos on

Recommended Stories