पावसाळा आला की बाल्कनी घरातली सगळ्यात सुंदर आणि शांत जागा बनते. पण पाणी, ओल आणि चिखलामुळे तिचा लुक लवकर खराब होतो. अशावेळी काही रेन-फ्रेंडली डेकोर आयडिया वापरल्या, तर तुमची छोटी बाल्कनीसुद्धा एक कोझी, क्लासी आणि इन्स्टाग्राम-परफेक्ट कॉर्नर बनेल. विशेष म्हणजे, या आयडियामुळे तुमची जागा स्टायलिश दिसेल आणि मेंटेन करणंही सोपं होईल.
26
पावसाळ्यात कापडी कार्पेट लवकर ओले होतात आणि खराब होऊ शकतात. त्याऐवजी वॉटरप्रूफ आउटडोअर रग, प्लास्टिक मॅट किंवा रबर बेस मॅट वापरा. हे पाण्याने लवकर खराब होत नाहीत आणि बाल्कनीला एक उबदार, कोझी लुक देतात. हलके बेज, हिरवे किंवा टेराकोटा रंग पावसाळ्यात खूप क्लासी दिसतात.
36
पावसात झाडं झपाट्याने वाढतात, त्यामुळे बाल्कनीला फ्रेश आणि हिरवागार लुक देण्यासाठी हँगिंग प्लांटर किंवा व्हर्टिकल गार्डन एक उत्तम पर्याय आहे. यामुळे जमिनीवर पाणी साचण्याची समस्या कमी होते आणि जागाही मोकळी दिसते. मनी प्लांट, फर्न, इंग्लिश आयव्ही आणि फुलांच्या वेली पावसाळ्याच्या थीमसाठी छान दिसतात.
पावसाळ्याच्या संध्याकाळ अधिक सुंदर बनवण्यासाठी वॉटर रेझिस्टंट फेअरी लाइट्स, सोलर लँटर्न किंवा LED स्ट्रिंग लाइट्स लावू शकता. मंद पिवळा प्रकाश बाल्कनीला कॅफेसारखा फील देतो. अशी लायटिंग निवडा जी ओल आणि पाऊस सहज सहन करू शकेल.
56
पावसात जड लाकडी फर्निचर लवकर खराब होऊ शकतं. त्याऐवजी पावडर-कोटेड मेटल, रतन फिनिश किंवा फोल्डेबल आउटडोअर खुर्च्या आणि टेबल निवडा. यामुळे गरज पडल्यास फर्निचर सहज आत ठेवता येतं आणि बाल्कनीचा लुकही एलिगंट राहतो.
66
जर तुमच्या बाल्कनीत खूप जास्त पाणी येत असेल, तर ट्रान्सपरंट PVC रेन कर्टन किंवा बांबूची स्क्रीन लावणं एक चांगली आयडिया आहे. यामुळे पावसाचं पाणी थेट आत येणार नाही आणि बाहेरचा व्ह्यूसुद्धा दिसेल. सोबतच, हे एक डेकोर एलिमेंट म्हणून काम करतं आणि जागेला अधिक प्रीमियम लुक देतं.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .