Luxury Wall Tiles: घर दिसेल 5-स्टार हॉटेलसारखं, फक्त एका भिंतीवर लावा या खास टाइल्स

Published : May 21, 2026, 04:30 PM IST

Luxury Wall Tiles घराला एकदम आलिशान लुक देण्यासाठी आता खूप पैसे खर्च करायची गरज नाही. कमी बजेटमध्ये प्रीमियम इंटीरियरचा फील हवा असेल, तर खोलीच्या फक्त एका भिंतीवर या खास लक्झरी टाइल्स लावा.  

PREV
15

Luxury Wall Tiles आजकाल घराला लक्झरी आणि मॉडर्न लुक देण्यासाठी संपूर्ण घराचा मेकओव्हर करण्याची गरज नाही. इंटिरियर डिझायनर्सच्या मते, खोलीतील फक्त एक भिंत हायलाइट करून संपूर्ण रूमचा लुक बदलता येतो. कमी बजेटमध्ये घराला लक्झरी टच देण्यासाठी वॉल टाइल्स हा एक उत्तम आणि टिकाऊ पर्याय आहे.

25
ज्योमेट्रिक पॅटर्न टाइल्स: घराला मॉडर्न आणि 'इन्स्टाग्राम-रेडी' लुक हवा असेल, तर ज्योमेट्रिक पॅटर्नच्या टाइल्स नक्की ट्राय करा. यांचे वेगवेगळे आकार आणि रंगसंगती भिंतीला एक आर्टिस्टिक टच देतात.
35
मार्बल फिनिश टाइल्स: तुम्हाला हॉटेलसारखं प्रीमियम इंटेरिअर आवडत असेल, तर मार्बल फिनिश वॉल टाइल्स हा एक उत्तम पर्याय आहे. या टाइल्समधील गोल्डन किंवा ग्रे वेन्स (शिरा) असलेली डिझाइन भिंतीला खूप क्लासी बनवते. लिव्हिंग रूम किंवा प्रवेशद्वाराजवळच्या भिंतीवर तुम्ही या टाइल्स लावू शकता.
45

वुड टाइल्स: तुम्हाला घराला निसर्गाच्या जवळ ठेवणारं डिझाइन आवडत असेल, तर वुडन टाइल्सचा भिंतीवर असा वापर करू शकता. लिव्हिंग रूमच्या बाजूच्या भिंतीवर या टाइल्स अधिक चांगल्या दिसतात. खाली एखादी फुलदाणी किंवा इनडोअर प्लांट ठेवून तुम्ही हा लुक आणखी खुलवू शकता.

 

55

टेक्सचर्ड स्टोन टाइल्स: घरात थोडा नॅचरल आणि वॉर्म लुक हवा असेल, तर स्टोन टेक्सचरच्या टाइल्स हा एक उत्तम पर्याय आहे. या टाइल्स भिंतीला 3D आणि डेकोरेटिव्ह लुक देतात, ज्यामुळे संपूर्ण जागा महागडी आणि डिझायनर वाटते. लिव्हिंग एरियाच्या फीचर वॉलवर तुम्ही या टाइल्स लावू शकता.

 

Read more Photos on

Recommended Stories