या घटनेनंतर कच्चे नुडल्स खाणे आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकते हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अवघ्या १३ वर्षांच्या मुलाचा या नुडल्समुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयात शोककळा पसरली आहे. नेमका त्याचा मृत्यू कसा झाला जाणून घ्या…
सहजा नुडल्स गरम पाण्यात वाफवून नंतर ते फ्राय करत खाल्ले जातात. मुलांना तर ते एवढे आवडतात की घरी खायला काही नसेल तर मुले लगेच नुडल्स ऑर्डर करतात. पण हे नूडल्स कच्चे खाल्ल्याने किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हे नुडल्स तुमचा जीवही घेऊ शकतात.
26
आरोग्याला धोकादायक
अलीकडेच ही घटना समोर आली आहे, ज्यामध्ये इजिप्तच्या कैरो येथील १३ वर्षीय मुलाने नाश्त्याला ३ पाकीटे इन्स्टंट नूडल्स खाल्ल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्याने नुडल्स न उकडता केवळ कच्चे खाल्ले होते. त्यामुळे त्याच्या पचनसंस्थेवर मोठा दबाव आहा. कच्चे नूडल्स खाणे आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकते हे त्यानंतर समोर आले.
36
काय झाले?
रिपोर्टनुसार, मुलाने मोठ्या प्रमाणात कच्चे नुडल्स खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण झाल्या. कोरडे नुडल्स खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या वाढली आणि जास्त सोडियम असलेले नुडल्स खाल्ल्याने हृदयावर थेट परिणाम झाला. मुलाला तीव्र पोटदुखी आणि उलट्यासारखी लक्षणे दिसू लागली, त्यानंतर त्याचा काही वेळात मृत्यू झाला.
इन्स्टंट नुडल्समध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, जे थेट यकृतावर परिणाम करते. जास्त सोडियम असलेले नुडल्स खाल्ल्याने रक्तदाब अचानक वाढतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २००० मिलीग्रॅमपेक्षा जास्त सोडियमचे नुडल्स सेवन करू नये, पण कच्च्या नुडल्समध्ये १८२९ मिलीग्रॅम सोडियम असते, जे खूप जास्त आहे. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
56
कच्च्या नुडल्समुळे डिहायड्रेशन
इन्स्टंट नुडल्समध्ये फायबरही कमी असल्याने टाइप २ मधुमेह, कोलन कॅन्सर आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. कच्चे नुडल्स पचायला कठीण असतात, ज्यामुळे आतड्यांना अडथळा निर्माण होऊ शकतो. पचनातून पाणी शोषून घेतल्याने कच्चे नुडल्स डिहायड्रेशनला कारणीभूत ठरू शकतात.
66
MSG चे दुष्परिणाम
इन्स्टंट नूडल्समध्ये MSG नावाचा एक घटक असतो, जो सामान्यतः अनेक प्रोसेस्ड फूडमध्ये आढळतो. हा घटक अन्नाची चव आणि सुगंध वाढवतो. अनेक पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या MSG ला FDA ने मान्यता दिली आहे. तरीही त्याचे जास्त सेवन शरीरावर दुष्परिणाम करू शकते. MSG खाल्ल्यानंतर डोकेदुखी, मळमळ, उच्च रक्तदाब, अशक्तपणा, स्नायूंची ताठरता, छातीत दुखणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि त्वचेवर लालसरपणा अशी लक्षणे दिसून येतात असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.