Maruti Suzuki ने लॉन्च केली दमदार व्हिक्टोरिस कार, केवळ 11000 रुपयांमध्ये करा बुक!

Published : Sep 03, 2025, 05:53 PM IST

ह्युंडाई क्रेटाशी स्पर्धा करु शकेल अशी मारुती सुझुकीची स्टायलिश आणि दमदार व्हिक्टोरिस कार लाँच झाली आहे. परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेली ही कार आता केवळ ११ हजार रुपयांना बुक करता येणार आहे.

PREV
16
मारुतीची नवी SUV

मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक मागणी असलेली कार कंपनी आहे. कमी किंमत, कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्हता यामुळे बहुतेक लोक मारुती सुझुकीच्या गाड्या घेतात. विक्रीच्या यादीतही या कंपनीच्या गाड्याच नेहमी आघाडीवर असतात. आता कंपनीने नवी प्रीमियम SUV मारुती सुझुकी विक्टोरिस सादर केली आहे.

26
व्हिक्टोरिस लाँच

ही गाडी मारुती ब्रेझापेक्षा मोठी आहे, पण ग्रँड विटारापेक्षा थोडी लहान आहे. ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस, स्कोडा कुशाक यांसारख्या प्रीमियम SUV गाड्यांना ती थेट टक्कर देईल.

बुकिंग आणि किंमत

मारुती सुझुकी विक्टोरिसचे बुकिंग फक्त ₹11,000 रुपयांत सुरू झाले आहे. अधिकृत डीलर्सकडे किंवा ऑनलाईन पद्धतीनेही ग्राहक गाडीचे बुकिंग करू शकतात.

36
इंजिनचे ऑप्शन

ही कार दोन इंजिन पर्यायांत उपलब्ध आहे –

1.5 लिटर पेट्रोल इंजिन

1.5 लिटर स्ट्रॉंग हायब्रिड इंजिन

लवकरच CNG व्हेरिएंटदेखील लॉन्च होणार आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर आणि CVT अशा गिअरबॉक्सचे पर्याय आहेत.

46
सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये

या गाडीत लेव्हल 2 ADAS सिस्टीम, 6 एअरबॅग्स आणि सरकारने अनिवार्य केलेली सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, विक्टोरिसला Bharat NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. यापूर्वी मारुती सुझुकी डिजायरला 5-स्टार रेटिंग मिळाले होते.

56
इंटीरियर आणि फिचर्स

गाडीत फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरामिक सनरूफ यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय 360-डिग्री कॅमेरा आणि 60 हून अधिक कनेक्टेड फिचर्सदेखील देण्यात आले आहेत.

66
प्रीमियम फीचर्स

या कारमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर दिले आहेत. हुंदाई क्रेटाला टक्कर देण्यासाठी मारुती ही कार बाजारात आणली आहे. या कारला चांगली मागणी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Read more Photos on

Recommended Stories