इंस्टाग्रामवर आलं नवीन अपडेट, AI मुळं प्रायव्हसी येणार धोक्यात

Published : Jul 10, 2026, 08:58 PM IST
instagram

सार

इंस्टाग्रामने 'Muse Image' नावाचे नवीन AI अपडेट आणले आहे, ज्यामुळे युजर्सच्या फोटोंचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. या अपडेटमुळे पब्लिक अकाउंटवरील फोटो AI मॉडेलसाठी वापरले जाऊ शकतात, पण युजर्सना सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर बंद करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

सोशल मीडियावर सध्याच्या काळात कधी काय होईल सांगता येत नाही. सध्याच्या काळात व्हाट्स अँपने नवीन अपडेट केलं आहे. इंस्टाग्रामवर नवीन अपडेट आलं असून Muse Image हे नवीन अपडेट कंपनीनं आणलं आहे. या अपडेटमध्ये इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटो हे AI च्या मदतीने बनवून युझरची फसवणूक होऊ शकते.

याचा होऊ शकतो चुकीचा वापर 

जर एखाद्या व्यक्तीच इंस्टाग्राम अकाउंट हे पब्लिक असेल तर त्याच्या फोटोंचा दुरुपयोग होऊ शकतो. यासाठी आपले फोटो वापरले गेले आहेत याची माहिती दरवेळी युजरला मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं याच्या वापराबद्दल युझरकडून प्रश्नचिन्ह व्यक्त केलं जात आहे. भविष्यात हा पर्याय बंद करण्याचा कंपनीने ऑप्शन दिला आहे.

नवीन अपडेट बंद करता येणार 

आपल्याला हे नवीन अपडेट बंद करता येणार आहे. मेटावर जाऊन आपण हे अपडेट बंद करू शकता. आपण इंस्टाग्रामच्या सेटिंगमध्ये जाऊन Sharing and Reuse या विभागातील AI संबंधित पर्याय बंद करू शकता. या निर्णयावर अनेक युजरने टीका केली आहे. आपल्याला हा पर्याय स्वतःहून बंद करावा लागतो, त्यामुळं युजरने संताप व्यक्त केला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

ChatGPT : 80s Trend जुना झाला; आता ट्राय करा हे 5 भन्नाट AI फोटो स्टाइल्स
iPhone Price Hike : ऍपलचा मोठा झटका! iPhone 17 तब्बल 17,000 रुपयांनी महागला, जाणून घ्या नवी किंमत