Gold - Silver Rate Today : सोने-चांदीच्या किमतीत वाढ, किती आहे १० ग्रॅमसाठीचा आजचा दर?

Published : Jul 10, 2026, 04:31 PM IST
Gold Silver Rate Today

सार

Gold Silver Rate 10 July 2026 : सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. 

मुंबई : मागील काही दिवसांपूर्व सोने-चांदी दरात चढ-उतार होत आहे. हा आठवडा सोने दरात सतत घसरण झाली आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारीही मौल्यवान धातूच्या दरात कमी झाली आहे. चांदीचा दर ३ टक्क्यांनी घसरला आहे. तर सोन्याचा दरही उतरला आहे.

सराफा बाजारात आजचा सोन्याचा भाव किती?

आंतरराष्ट्रीत स्तरावर सोने - चांदी दरात घसरण झाली आहे. मात्र भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. गुड रिटर्न्सनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ३८० रुपयांच्या वाढीसह १,४४,८२० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ३५० रुपयांनी वाढला आहे. ही वाढ झाल्यानंतर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३२,७५० रुपये इतका झाला आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दरातही २९० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २९० रुपयांच्या वाढीसह १८ कॅरेट सोन्याचा दर १०८६२० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीचा दर काल गुरुवारी १० हजारांनी कमी झाला होता. मात्र आज शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीची किंमत ५००० रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आजचा सोन्याचा भाव २,४०,००० रुपयांवर पोहोचला आहे.

मौल्यवान धातूच्या वाढीमागे कारण काय?

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबायचं नाव घेतल नाही. दोन्ही देशातील तणाव वाढल्याचा परिणाम सोने-चांदी दरावर झाला आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढण्याची गुंतवणुकदारांमध्ये भीती आहे. वाढती, महागाई, दोन देशांतील संघर्ष या अनिश्चिततेच्या भीतीमुळे सोने-चांदी दरात चढ-उतार होत आहेत.

वायदे भाव किती?

सोन्याचा ऑगस्ट २०२६ च्या डिलीव्हरीसाठी वायदे भाव ८९९ रुपयांनी घसरला. त्यामुळे सोने दर १,४४,४०१ रुपये प्रति तोळा झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव १,४५,३०० रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर आज तो काहीसा घसरणीसह १,४४,८९० रुपयांवर सुरू झाला.

दुसरीकडे चांदीचा वायदे भाव ३,७७७ रुपयांनी घसरला. त्यामुळे एक किलोग्रॅम चांदीचा दर २,२२,६०० रुपये किलो इतका आहे. मागील सत्रात चांदीचा रेट २,२६,३७७ रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर आज तो पुन्हा २,२६,३६८ रुपयांवर व्यवहार सुरू झाला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Silver Baby Earrings: चिमुकली कानातले 2 हजारांत पाहा, भारी डिझाइन्स
Gold Exchange Offer: जुनं सोनं द्या, नवे दागिने घ्या! जुन्यालाही पूर्ण किंमत