2000 Rupee Notes : तुमच्याकडे अजूनही २ हजारची नोट आहे? बंद झालेल्या चलनाबाबत RBI ची महत्त्वाची माहिती

Published : Jul 09, 2026, 06:17 PM IST
RBI Rs 2000 Notes

सार

2000 Rupee Notes RBI Update : तुमच्याकडे अजूनही बाजारात बंद झालेल्या २००० रुपयांच्या नोटा असतील तर त्या बदलू शकता. आरबीआयने याबाबत माहिती दिली आहे. 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी केली. नोटबंदीनंतर सरकारने सर्व जुन्या नोटा बंद केल्या. २०१६ मध्ये एक हजार रुपयांची नोटही बंद करण्यात आली. या नोटबंदीनंतर १००, २००, ५०० आणि ५००, २००० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात येण्यास सुरुवात झाली. पण त्यानंतर काही वर्षात नव्या आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटाही बाजारात बंद करण्यात आल्या. सध्या केवळ नव्या आलेल्या नोटांपैकी १००, २००, ५०० च्या नोटा बाजारात चलनात आहेत. पण २००० रुपयांची नोट बंद आहे.

RBI कडून २ हजाराच्या नोटांबाबत महत्त्वाची अपडेट

ज्यांच्याकडे २ हजाराच्या नोटा आहेत, त्यांनी त्या परत बँकेत देण्याचं सांगण्यात आलं होतं. २ हजाराची नोट बाजारात बंद झाली असली, तरी आजही अनेकांकडे या नोटा पडून आहेत. नोटा आहेत मात्र त्या वापरता येत नाहीत. अनेकांना या २ हजाराच्या नोटा आता फुटक जातील, वाया जातील असं वाटतं होतं. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थात RBI ने या बंद झालेल्या २ हजाराच्या नोटेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

२००० रुपयांची अजूनही तुमच्याकडे असेल तर काय कराल?

RBI ने अधिकृत ट्विटर अर्थात X अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - RBI ने सांगितलंय, की तुमच्याकडे अजूनही २ हजार रुपयाच्या नोटा असतील तर तुम्ही त्या बँकेत जाऊन बदलून घेऊ शकता. RBI च्या १९ इश्यू ऑफिसमध्ये जाऊन या नोटा बदलून घेऊ शकता. पण या ऑफिसला तुम्ही जाऊ शकत नसाल, तर पोस्टातून तुम्ही कोणत्याही आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये २००० रुपयांच्या नोटा पाठवून, याची रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करू शकता.

त्यामुळे तुमच्याकडेही 2023 मध्ये बंद करण्यात आलेली २ हजार रुपयांची नोट असेल, तर ती बदलून घेऊ शकता आणि तुमचं नुकसान टाळू शकता.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gold-Silver Rate Today : सोने दरात वाढ, तर चांदीचा भाव १० हजारांनी कमी झाला
Mobile Safety : हॅकर्सची भीती वाटतेय? या सोप्या टिप्सने ठेवा तुमचा स्मार्टफोन सुरक्षित