तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी फॉलो करा या सिम्पल 5 टिप्स

Published : Apr 19, 2025, 01:15 PM ISTUpdated : Apr 19, 2025, 06:45 PM IST

सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर अत्याधिक प्रमाणात केला जात आहे. या प्लास्टिक मनीच्या माध्यमातून शॉपिंग ते बिल पेमेंटसाठी वापर केला जाते. पण क्रेडिट कार्डचा वापर करताना बहुतांशवेळा मर्यादेची समस्या येते. याबद्दलच जाणून घेऊ.

PREV
16
क्रेडिट कार्डचा वापर

सध्याच्या काळात वाढलेले खर्च आणि गरजांसह क्रेडिट कार्ड एक गरजेचा भाग झाला आहे. मध्यम वर्गातील बहुतांशजण क्रेडिट कार्डवर अवलंबून राहतात. पण काही वेळेस क्रेडिट कार्डच्या मर्यादेमुळे काही गरजा पूर्ण करू शकत नाही. यामुळेच क्रेडिट कार्डची मर्यादा कशी वाढवावी असा प्रश्न पडला जातो. जाणून घेऊया क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात याबद्दल पुढे सविस्तर...

26
बिलाचे पेमेंट वेळेवर करा

क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी प्रत्येक महिन्यात आपल्या क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट वेळेवर करा. यामुळे कंपनीला विश्वास निर्माण होतो की, तुम्ही पैशांचा योग्य वापर करत आहात. जर वेळेवर क्रेडिट कार्डचे पेमेंट केले नाही तर क्रेडिट स्कोर बिघडला जातो. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी समस्या येऊ शकते. अशातच मर्यादा वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे पेमेंट हिस्ट्री व्यवस्थितीत असावी.

36
क्रेडिट युटिलाइजेशन रेशो

क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी क्रेडिट युटिलाइजेशन रेशो लक्षात घेतला पाहिजे. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही सध्याच्या क्रेडिट मर्यादेचा किती वापर करत आहात. जसे की, तुमची मर्यादा 100,000 रुपये आहे आणि तुम्ही 80,000 रुपये खर्च करत असाल तर रेशो 80 टक्के होते. अशात मर्यादा वाढवण्यास समस्या येऊ शकते. क्रेडिट युटिलाइजेशन रेशो 30 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास क्रेडिट स्कोर उत्तम राहतो.

46
कंपनीशी बोला

बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीशी थेट संपर्क करुन क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकता. पण यासाठी कमीत कमी 6 महिन्यांपर्यंत क्रेडिट कार्डचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. याशिवाय बिलाचे पेमेंट वेळेवर करावे. बँक किंवा फोन अथवा ऑनलाइन अ‍ॅपच्या मदतीने मर्यादेसाठी विनंती करू शकता.

56
वाढलेल्या उत्पन्नाची माहिती अपडेट करत रहा

क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँका किंवा कंपनी तुमची कमाई किती आहे हे पाहते. यामुळे वेळोवेळी वाढलेल्या उत्पन्नाची माहिती देत रहा. यामुळे बँकेला वाटते की, तुम्ही क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरू शकता.

66
अधिक क्रेडिट कार्ड घेऊ नका

काहीजण एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्सचा वापर करतात. जेणेकरुन वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर करता येईल. पण असा विचार करणे चुकीचे आहे. काही क्रेडिट कार्ड्ससाठी रिक्वेस्ट केल्यास क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो. अशातच तुमच्याकडे आधी असलेल्या क्रेडिट कार्डचा वापर योग्य पद्धतीने करा. क्रेडिट स्कोर उत्तम असल्यास एकाच कार्डची मर्यादा वाढवू शकता.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

Recommended Stories