Rakshabandhan Gift Ideas : रक्षाबंधनासाठी भावाला काय द्यायचं? हे 5 गॅजेट्स आहेत बेस्ट ऑप्शन!

Published : Aug 14, 2026, 10:15 PM IST
Rakshabandhan Gift Ideas : रक्षाबंधनासाठी भावाला काय द्यायचं? हे 5 गॅजेट्स आहेत बेस्ट ऑप्शन!

सार

यंदाच्या रक्षाबंधन 2026 ला तुमच्या भावाला पारंपरिक भेटवस्तू देण्याऐवजी काहीतरी हटके टेक गॅजेट्स द्या. boAt स्मार्ट रिंग, वायरलेस इअरबड्स आणि गेमिंग कीबोर्डसारखे अनेक पर्याय आहेत, जे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्वस्तात मिळतील.

यंदाच्या रक्षाबंधन 2026 ला तुम्ही तुमच्या लहान भावासाठी बेस्ट टेक गिफ्ट शोधत आहात का? तर मग चिंता करू नका. फ्लिपकार्ट फ्रीडम सेल आणि अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल दरम्यान तुम्ही या वस्तू मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. यावर्षी रक्षाबंधन २८ तारखेला आहे. तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला काय गिफ्ट द्यायचं या विचारात असाल, तर आम्ही तुमची मदत करतो. नेहमीप्रमाणे राखी आणि पैसे देण्याऐवजी काहीतरी वेगळं द्यायचं असेल, तर अनेक टेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या २०२६ च्या स्वातंत्र्य दिनाच्या सेलमध्ये तुम्हाला १००० ते ३००० रुपयांच्या बजेटमध्ये भावासाठी एक चांगलं रक्षाबंधन गिफ्ट निवडण्याची संधी मिळेल.

boAt Smart Ring Active

स्मार्टवॉच तर आता कॉमन झालंय, त्यामुळे तुम्ही त्याऐवजी boAt स्मार्ट रिंगचा विचार करू शकता. ही एक स्क्रीन नसलेली हेल्थ ट्रॅकिंग रिंग आहे. या स्मार्ट रिंगची किंमत साधारणपणे ३००० रुपयांपर्यंत असू शकते, पण स्वातंत्र्य दिनाच्या सेलमध्ये ती १५०० ते २००० रुपयांपर्यंत मिळू शकते. त्यामुळे ही एक चांगली डील ठरू शकते.

OnePlus Buds 3 & Realme Buds Air 6 Pro

तुमचा भाऊ कॉलेजमध्ये शिकत असेल आणि तुम्हाला बजेटमध्ये गिफ्ट घ्यायचं असेल, तर तुम्ही या वायरलेस इअरबड्सचा विचार करू शकता. दोन्ही इअरबड्स प्रीमियम डिझाइन आणि उत्तम साउंड क्वालिटी देतात. यांची किंमत ३००० रुपयांपर्यंत जाऊ शकते, पण सेलमध्ये डिस्काउंट मिळाल्याने किंमत आणखी कमी होऊ शकते.

Instant Camera

जर बजेटची चिंता नसेल आणि तुम्हाला तुमच्या भावाला टेक्नॉलॉजीसोबत आठवणी जपणारं काहीतरी द्यायचं असेल, तर इन्स्टंट कॅमेरा एक चांगला पर्याय आहे. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ७,००० ते १०,००० रुपयांच्या रेंजमध्ये अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. सेलची वाट पाहिल्यास तुमचे काही पैसे वाचू शकतात.

Primebook 2 Max

तुमचा भाऊ किंवा बहीण कॉलेज स्टुडंट असेल, तर प्राइमबुक 2 मॅक्सचाही विचार करता येईल. याची किंमत २९,९९० रुपये आहे, पण सेलमध्ये यावर १००० रुपयांची फ्लॅट सूट आणि १७५० रुपयांपर्यंत इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळू शकतो. यामुळे याची किंमत आणखी कमी होईल. ज्यांना एकदम पूर्ण पेमेंट करायची नाही, त्यांच्यासाठी निवडक बँक कार्ड्सवर ३ ते ६ महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही आहे. प्राइमबुक 2 मॅक्स हा खास विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेला अँड्रॉइड-आधारित लॅपटॉप आहे.

Gaming Keyboard

तुमच्या लहान भावाला गेमिंगची आवड असेल, तर एक मेकॅनिकल गेमिंग कीबोर्ड त्याच्यासाठी एक भारी गिफ्ट ठरू शकतं. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर १००० ते ३००० रुपयांच्या रेंजमध्ये चांगले फीचर्स असलेले अनेक कीबोर्ड उपलब्ध आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Aadhaar Card on WhatsApp : आधार कार्ड घरी विसरलात? सोप्या प्रोसेसने मिनिटांत डाउनलोड करा
ATM Fraud : खात्यातून पैसे गायब, CCTV फुटेज बँकेला देता आलं नाही; SBI कडून ग्राहकाला लाखोंची नुकसानभरपाई