ATM Fraud : खात्यातून पैसे गायब, CCTV फुटेज बँकेला देता आलं नाही; SBI कडून ग्राहकाला लाखोंची नुकसानभरपाई

Published : Aug 14, 2026, 05:36 PM ISTUpdated : Aug 14, 2026, 05:38 PM IST
SBI

सार

ATM Fraud SBI Compensation : ग्राहकाच्या खात्यातून पैसे कट झाल्यानंतर एसबीआय बँकेला सीसीटीव्ही फुटेज देता आलं नाही. त्यानंतर बँकेला नुकसानभरपाई द्यावी लागली आहे.

नवी दिल्ली : नोकरीला लागल्यानंतर जवळपास सर्वच जण आपल्या कमाईतील काही रक्कम सेव्ह करतात. काही जण एसआयपी, पोस्ट ऑफिस, एलआयसी तर काही जण बँकेतच हे पैसे जमा करतात. अनेक वर्ष पैसे साठवून तुम्हाला अंदाज असतो, की आपली मोठी रक्कम जमा झाली आहे. पण बँक खात्यातून अचानक तुम्ही सेव्ह केलेली ही लाखोंची रक्कम कोणी काढल्याचं लक्षात आलं तर? पायाखालची जमिनीच सरकेल. तात्काळ याप्रकरणी बँकेत तक्रार केली जाईल. पण बँक तुमच्या नकळत झालेल्या या व्यवहाराची माहिती किंवा तुमच्या व्यवहाराची नोंद तुम्हाला देऊ शकली नाही, तर या परिस्थिती मोठी समस्या निर्माण होईल. अशीच काहीशी घटना एका ग्राहकासोबत घडली आहे.

SBI बँकेचा ग्राहक असलेल्या एका व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. त्या व्यक्तीच्या अकाऊंटमधून लाखो रुपयांहून अधिकची रक्कम त्याच्या परवानगीशिवाय ट्रान्सफर करण्यात आली. या प्रकरणानंतर ग्राहकाने, ग्राहक आयोगात तक्रार केली. त्यानंतर ग्राहक आयोगाकडून बँकेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. या परस्पर व्यवहारांनंतर बँकेने ग्राहकाना नुकसानभरपाई दिली आहे.

बँकेकडून ग्राहकाला द्यावी लागली लाखोंची नुकसानभरपाई

याप्रकरणी दिल्ली राज्य ग्राहक आयोगाने बँकेला नुकसानभरपाईचे आदेश दिले. बँकेकडून ग्राहकाला १.३० लाख देण्यात आले. शिवाय १० हजार रुपये अतिरिक्त नुकसानभरपाई देण्यात आली. हे प्रकरण १२ ऑक्टोबर २०१८ रोजी समोर आलं. त्यामुळे २०१८ पासून या रकमेवर ६ टक्के वार्षिक व्याजही बँकेला लावण्यात आलं आहे.

पण नेमकं काय घडलं होतं?

२०१८ मध्ये ग्राहकाच्या अकाऊंटमधून एकाच दिवशी चार वेळा एटीएममधून पैसे काढण्यात आले. असे ८० हजार काढण्यात आले. त्यानंतर १० हजार, १० हजार असे दोन बँक ट्रान्सफरदेखील करण्यात आले. एकूण १.३० लाख रुपये काढण्यात आले.

पैसे कट झाल्याचं समजल्यानंतर ग्राहकाने तात्काळ बँकेत धाव घेतली. बँकेकडे एटीएम ट्रान्झेक्शनचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं. पण बँकेने या ट्रान्झेक्शनचं कोणतंही सीसीटीव्ही ग्राहकाला दिलं नाही.

ग्राहकाने पासबुक अपडेट केलं, त्यावेळी त्याला ही रक्कम काही दिवस आधीच काढल्याचं समजलं. त्याने बँकेत तक्रार केली, मात्र कोणतंही उत्तर न मिळाल्याने हे प्रकरण ग्राहक आयोगात गेलं. त्यानंतर बँक ग्राहकाला एटीएम सीसीटीव्ही किंवा इतर डिटेल्स देऊ शकली नसल्याने ग्राहकाला नुकसानभरपाई द्यावी लागली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

AI Content : सगळं खोटं, पण कमाई लाखात; AI फेक पोस्टमधून महिन्याला १६ लाख कमावतोय हा पठ्ठ्या
iQOO Neo 11 Ultra : 9100mAh बॅटरी, 50MP कॅमेरासह येतोय नवा फोन; फीचर्स एकदा बघाच