Data Safety: जुना फोन विकताय? या ४ गोष्टी नक्की करा, नाहीतर पश्चाताप होईल!

Published : May 30, 2026, 04:02 PM IST
smartphone

सार

जुना स्मार्टफोन विकण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं काम कोणतं? फक्त गॅलरीतून फोटो-व्हिडिओ डिलीट करणं पुरेसं आहे का? फोन विकण्याआधी शेवटची आणि सर्वात महत्त्वाची स्टेप कोणती आहे? जाणून घ्या.

आजकाल स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे फोन थोडा जुना झाला की, लोक तो विकून किंवा एक्सचेंज करून नवीन फोन घेतात. पण अनेकदा जुना फोन विकण्याच्या नादात आपण तो व्यवस्थित 'क्लीन' करायला विसरतो. हीच गोष्ट नंतर आपल्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. सायबर तज्ज्ञांच्या मते, डेटा व्यवस्थित न काढता फोन विकल्यास तुमच्या प्रायव्हसीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. फक्त गॅलरीतून फोटो-व्हिडिओ डिलीट करणं पुरेसं नाही, कारण अनेकदा डिलीट केलेला डेटाही परत मिळवता येतो. तुमची खासगी माहिती चुकीच्या हातात पडल्यास सायबर फ्रॉड किंवा डेटा लीकसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. म्हणूनच, फोन विकण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे.

सर्वात आधी संपूर्ण डेटा बॅकअप घ्या

फोन विकण्यापूर्वी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या सगळ्या डेटाचा बॅकअप घेणं. यात तुमचे फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट्स आणि डॉक्युमेंट्स यांचा समावेश असतो. तुमचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी तुम्ही Google Drive, iCloud, हार्ड ड्राइव्ह किंवा लॅपटॉपचा वापर करू शकता.

गुगल किंवा ॲपल आयडी नक्की काढा

जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर गुगल अकाउंट लॉगआउट आणि डिलीट करायला विसरू नका. तर आयफोन (iPhone) वापरणाऱ्यांनी आपलं ॲपल आयडी (Apple ID) डिव्हाइसमधून काढून टाकणं आवश्यक आहे. अनेकजण फक्त डेटा डिलीट करतात, पण अकाउंट लॉगआउट करायला विसरतात, ज्यामुळे नंतर धोका वाढू शकतो. त्यामुळे फोन विकण्यापूर्वी अकाउंट लॉगआउट करा आणि मगच ॲप्स डिलीट करा.

बँकिंग आणि UPI ॲप्स पूर्णपणे साफ करा

फोन विकण्यापूर्वी सर्व बँकिंग, UPI आणि डिजिटल वॉलेट ॲप्समधून लॉगआउट करून ते अनइन्स्टॉल करा. फक्त ॲप काढून टाकणं पुरेसं नाही, तर आधी सर्व अकाउंट्समधून लॉगआउट करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमची आर्थिक माहिती कोणाच्याही हाती लागणार नाही.

फॅक्टरी रिसेट करा

सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे फॅक्टरी रिसेट (Factory Reset) करणं. यामुळे फोनमधील सगळा डेटा पूर्णपणे पुसला जातो आणि डिव्हाइस पुन्हा नवीन असल्यासारखं होतं. अधिक सुरक्षिततेसाठी तुम्ही एकापेक्षा जास्त वेळाही फोन रिसेट करू शकता. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही फॅक्टरी रिसेट करू शकता.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Tulsi Plant Hacks: तुळशीचं रोप वाढत नाहीये? या २ सोप्या टिप्सने ते होईल हिरवंगार आणि घनदाट
Kundan Toe Ring: जोडव्यांच्या लेटेस्ट डिझाइन्स, पायांवर दिसेल पारंपरिकतेचा ठसा