ट्रायकडून टेलिकॉम कंपन्यांना मेसेज ट्रेसेबिलिटी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. अशातच येत्या 1 डिसेंबरपासून मोबाइलवर येणाऱ्या ओटीपीसाठी वाट पहावी लागणार आहे. याशिवाय काही नियमही बदलले जाणार आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
Rules changes from 1st December 2024 : प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही गोष्टींसंदर्भातील नियम बदलले जाणार आहेत. नोव्हेंबरचा महिना संपण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असून नवा महिना म्हणजेच डिसेंबरची सुरुवात होणार आहे. अशातच येत्या 1 डिसेंबरपासून काही क्षेत्रातील नियमांत बदल होणार असल्याने प्रत्येक महिन्याप्रमाणे आताही सामान्याच्या खिशांवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया 1 डिसेंबरपासून कोणते नियम बदलणार याबद्दल सविस्तर…
ऑनलाइन पद्धतीने नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर हल्लेखोर बनावट ओटीपीच्या मेसेजची मदत घेतात. यामुळेच अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशातच फसवणूक करण्याच्या हेतून येणारे फोन, मेसेज पासून सुरक्षित राहण्यासह ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI)काही महिन्यांपूर्वी काही निर्देशन दिले होते.ट्रायने टेलिकॉम प्रोव्हाइडर्सला मेसेज ट्रेसेबिलिटी लागू करण्याच निर्देश देण्यासह येत्या 1 डिसेंबरपासून लागू करण्यास सांगितले आहे. यामुळेच मोबाइलवर ओटीपी येण्यास उशीर होऊ शकतो. ट्रायच्या मेसेज ट्रेसेबिलिटी रेग्युलेशननुसार, टेलिकॉम कंपन्यांकडून पाठवण्यात आलेले सर्व मेसेज ट्रेस करता येणारी असतील. जेणेकरुन फिशिंग आणि स्पॅमसाठी मेसेजिंग सिस्टिमचा दुरुपयोग करण्याला आळा बसेल. नव्या नियमानुसार, मेसेज पाठवणारा व्यक्ती ते मेसेज मिळवणाऱ्यापर्यंतच्या गोष्टी ट्रेसेबस असाव्यात.मेसेज ट्रेसेबलची घोषणा यापूर्वी ऑगस्ट महिन्यात केली होती. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना ही ट्रेसेबिलिटी प्रक्रियेला लागू करण्याच्या सुरुवातीला 31 ऑक्टोंबरपर्यंतचा वेळ दिला होता. यासाठी जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या मागण्यानंतर सध्याची मर्यादा वाढवून 30 नोव्हेंबर केली गेली.येत्या 1 डिसेंबरपासून या ट्रेसेबिलिटी प्रक्रिया लागू करण्यासग युजर्सला ओटीपी मिळण्यास थोडी वाट पहावी लागू शकते. यामुळे युजर्सला ऑनलाइन बँकिंग, बुकिंगसारख्या गोष्टींसाठी मोबाइलवर येणाऱ्या ओटीपीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील एलपीजीच्या किंमतीत बदल होतात. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीसह तेल मार्केटमधील कंपन्या प्रत्येक महिन्याला एअर टर्बाइन फ्यूल, सीएनजी, पीएनजीच्या किंमतीबद्दलची आढावा घेते. ऑक्टोंबर महिन्यात गॅस कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 48 रुपयांनी वाढ केली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. याआधी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमर्शियल एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल होती.
१ डिसेंबरपासून, येस बँकेकडून रिवॉर्ड पॉइंट्सची संख्या मर्यादित केली जाणार आहे. जे फ्लाइट आणि हॉटेलसाठी रिडीम केले जाऊ शकतात. एचडीएफसी बँक त्यांच्या Regalia क्रेडिट कार्डच्या ग्राहकांसाठी लाउंज प्रवेश नियमात देखील बदल करत आहे. नवीन नियमांमुळे ग्राहकांना 1 डिसेंबरपासून लाउंज प्रवेशासाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक तिमाहीत एक लाख रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ॲक्सिस बँकेने त्यांच्या वेगवेगळ्या ग्राहकांसाठी रिवॉर्ड पॉइंट नियम आणि क्रेडिट कार्ड शुल्क देखील सुधारित केले आहेत.
येत्या 1 डिसेंबरपासून जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण मालदीव्स येथे येण्यासाठी शुल्कात वाढ केली जाणार आहे. इकोनॉमी क्लासमधील प्रवाशांसाठी 2 ,532 रुपये ते 4,220 रुपये, बिझनेस क्लाससाठी 5,064 रुपये ते 10,129 रुपये असा शुल्क आकारला जाणार आहे. याशिवाय फर्स्ट क्लासच्या प्रवाशांकडून 20,257 रुपये ते 7,597 रुपये शुल्क आकारला जाणार आहे. प्रायव्हेट जेटने येणाऱ्या प्रवाशांना मालदीव्समध्ये प्रवेश केल्यानंतर 10,129 रुपये ते 40,515 रुपयापर्यंत डिपार्चर फी द्यावी लागणार आहे.
आणखी वाचा :
CAT शिवाय MBA प्रवेशासाठी कोण कोणते पर्याय, आपल्याला माहित आहेत का?